ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

गौतम हिरण हत्याकांड : ‘ह्या’ कारणामुळे अपहरण करून हत्या,खर कारण समोर…

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौतम हिरण हत्याकांडप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध 505 पानी दोषारोपपत्र दाखल आज कोर्टात दाखल करण्यात आले.

पैश्यासाठीच गौतम हिरण यांची अपहरण करून हत्या केल्याचा निष्कर्ष या दोषारोपत्रामध्ये काढण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरणातील अजय राजू चव्हाण (वय 26), नवनाथ धोंडू निकम (वय 23),

Advertisement

आकाश प्रकाश खाडे (वय 22), संदीप मुरलीधर हiडे (वय 26) आणि जुनेद/जावेद बाबू शेख (वय 25) या आरोपींविरुद्ध गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा Dy.s.p संदीप मिटके यांनी आज रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गौतम हिरण हत्याकांड प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 7 मार्च 2021 रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा लक्षवेधी ठरणार होता.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.

Advertisement

मिटके यांनी पाच मुख्य आरोपींना अटक करून आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली ओमिनि कार , पल्सर मोटरसायकल, हत्यार तपास कामी जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासण्यात आले व एकूण 505 पानाचे सबळ पुराव्यासह आज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ढग्याचा डोंगर (ता सिन्नर) येथे गुन्ह्यातील आरोपी एकत्र आले.

Advertisement

मयत गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावणेबाबत फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचला होता.

Advertisement
li