ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मिळणार 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यामुळे बळीराजाला एक मोठा दिलासा मिळणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत माहिती दिली.

Advertisement

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज 0 टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बिनव्याजी पीक कर्जाची ही सवलत पूर्वी केवळ १ लाख रूपयांपर्यंत होती. या निर्णयाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल. अस ट्विट अशोक चव्हाण यांनी केले.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

Advertisement

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Advertisement
li