ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विखे पाटलांचा आघाडी सरकार निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

यातच नेतेमंडळींकडून भेटीगाठी सुरु झाल्या व यातच आरोप – प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील सुरु झाल्या आहे.

Advertisement

नुकतेच याच मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाच्या अपयश हा फक्त राज्य सरकारचा आहे अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Advertisement

पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले जेव्हा राज्याच्या हातात परिस्थिती होती तेव्हा राज्य सरकारने काहीच केला नाही.

जे आरक्षण मराठा समाजाला मिळाले नाही त्यासाठी फक्त राज्य सरकार जबाबदार आहे आता सर्व संघटनांनी एकत्र येऊन राज्य सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव आणला पाहिजे.

Advertisement

मराठा आरक्षण प्रकरणात सरकारची बाजू कमी पडली राज्य सरकार ज्या पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे गेली होती. त्यापैकी त्या खंडपीठातील तीन न्यायमूर्तीचे मत आरक्षणाच्या विरोधात होते.

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून ही न्यायमूर्तींना बदल करण्याची मागणी केली पाहिजे होती.

Advertisement

मात्र ते सुद्धा या सरकारने केला नाही आणि आता निकाल लागल्यानंतर केंद्राकडे घटना दुरुस्ती करण्याची मागणी करत आहे.अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Advertisement
li