ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अरे हे काय चाललंय राज्यात ? आता काय म्हणे तर रिफ्लेक्टरचा तुटवडा आहे !

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-आतापर्यंत आपण कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे,ऑक्सिजन अथवा इतर वैद्यकीय साधनांचा तुटवडा असल्याचे ऐकले व पहिले आहे. मात्र आता एक वेगळ्याच गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

तो म्हणजे वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टरचा. परिणामी परत एकदा दरवाढ करून या वाहनधारकांना झटका दिला जाणार आहे, त्यामुळे मात्र वाहनचालक चिंतेत पडले आहेत.

Advertisement

परिवहन संवर्गगातील प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टिव टेप , रियर मार्किंग टेप, बसवणे बंधनकारक आहे.

मात्र ते बसविले नसल्याने पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वाहनाचे पासिंग रोखण्यात आले आहे. राज्यात रिफ्लेक्टरचा पुरवठा करणाऱ्या तीन पैकी एका कंपनीने प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याला उत्पादनास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

तर उर्वरित दोन कंपन्यांनी रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे. शिवाय रिफ्लेक्टरच्या किंमतीत ही मोठी वाढ करण्यात झाली आहे.

लॉकडाऊननंतर आयुष्य कसेबसे सुरू होत असतानाच आधीच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. आता पुन्हा अशा बाबींचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी वाहनचालक करीत आहेत .

Advertisement

li