आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३६१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७७ आणि अँटीजेन चाचणीत ३६८ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०४, नगर ग्रामीण ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०१, संगमनेर ११श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०६, जामखेड १०, कर्जत १५, कोपरगाव २६, नगर ग्रा.१०, नेवासा २०, पारनेर ३४, पाथर्डी १४, राहाता ३८, राहुरी १०, संगमनेर १९, शेवगाव २१, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३६८ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०३, अकोले २१, जामखेड २१, कर्जत ६२, कोपरगाव १९, नगर ग्रा. ०६, नेवासा २४, पारनेर ३६ पाथर्डी ३९, राहाता १०, राहुरी ४३, संगमनेर १७, शेवगाव २०, श्रीगोंदा ३५, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये:-  मनपा २४, अकोले ३८, जामखेड ५२, कर्जत २१, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ४८, नेवासा ३१, पारनेर ७३, पाथर्डी ५२, राहाता ४०, राहुरी ३८, संगमनेर ७८, शेवगाव ४३, श्रीगोंदा ६८, श्रीरामपूर ३४, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,६३,३२९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४३६१
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:४१८१
  • एकूण रूग्ण संख्या:२,७१,८७१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा