उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जिल्ह्यातील ह्या नेत्याचा हल्लाबोल ! तब्बल सतरा वर्षानंतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार सभेत कुकडी प्रकल्पातून एक टीएमसी पाण्यात देण्याचा शब्द पारनेरच्या जनतेला दिला होता.

त्यानंतर आता सतरा वर्षानंतर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झुम मीटिंग द्वारे आयोजित केलेल्या बैठकीत करून दिली आहे.

त्यामुळे या पाणी प्रश्नावरून शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी यांनी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.झूम मिटिंग मध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

कुकडी किंवा पिंपळगाव जोगा धरणाच्या वर्तनाबाबत पारनेर च्या जनतेवर कायमच अन्याय होत असून पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा बनला आहे. तर दुसरीकडे कुकडी धरणातून एक टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाण्याचे जनतेला दिले होते.

त्या मुद्द्याला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी हात घातला आहे. या कुकडीच्या पाणीप्रश्नी आपण उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबरोबर बैठक लावावी व त्या बैठकीला मलाही (माजी आमदार विजयराव औटी) निमंत्रित करावे अशी मागणी यावेळी केली.

या बैठकीत पारनेरला पाणी प्रश्नावर त्यांनी एक टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली होती, त्या बैठकीत त्यांना आठवण करून द्यायची आहे असेही माजी आमदार विजयराव औटी म्हणाले.

इतरही काही समस्यांबाबत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून आपण चर्चा करून सोडण्यास मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.