नवरदेव – नवरीसह 23 वर्‍हाडी आढळले कोरोनाबाधित

file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून थाणू मांडलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे सोहळे, संभारंभ यांच्यावर देखील निर्बंध लावले होते.

मात्र आता अनलॉक होतो तोच काही बेजबाबदारपणाने लागल्याने कोरोनात वाढ झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच एका लग्नसमारंभादरम्यान बाधित झालेल्या नवरी, नवरदेवासह 23 वर्‍हाडी मंडळी कोरोनाबाधित आढळून आले आहे.

यामुळे आता आणखी सतर्कता बळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील कनगर येथे नुकताच एक विवाह समारंभ पार पडला. विवाहाच्या दुसर्‍या दिवशी नवरदेवास व नवरीस त्रास होऊ लागल्याने

त्यांना देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले असता त्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. यामध्ये नवरी-नवरदेवासह दोन करवल्या बाधित आढळून आल्याने कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे

यांनी पुढील दक्षता म्हणून लग्नसमारंभास उपस्थित असलेले नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोविड चाचणी केली असता तब्बल 23 जण बाधित आढळून आले. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आणखी कोणी संपर्कात आले आहे का? याचा शोध सुरू आहे.