‘पिक्चरवाला’चे ‘गावठी पोट्टे’ गाणे झालेय लॉंच; शुक्रवारी येणार पहिला सीजन

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- पश्चिम महाराष्ट्रातील बदलती जीवनपद्धती आणि ग्रामीण राजकारणाचे कंगोरे उलगडून दाखवणारी एक भन्नाट युट्युब वेबसिरीज ‘पिक्चरवाला’ या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली आहे. या सिरीजचे ‘गावठी पोट्टे’ टीझर थीम सॉंग रविवारी (दि. 13 जून 2021) रिलीज झाले.

आचार्य प्र. के. अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा टीझर प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्रातील अबाल-वृद्धांचे मनोरंजन करतानाच ग्रामीण विकासाचा एक हटके संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न असल्याचे निर्माती माधुरी चोभे यांनी सांगितले.

त्यांनी अधिक माहिती देताना म्हटले आहे की, सध्या बदलत्या माध्यमांच्या युगात एक सामाजिक संदेश देतानाच मनोरंजन करण्याचा आमचा प्रात्न आहे. ‘गावठी पोट्टे’ या सिरीजमध्ये एकाच गावातील सर्व कलाकार एकत्र येऊन ग्रामीण विकासावर भरीव काम करण्याचा संदेश देत आहेत.

गावातील लहान मुलांचा ग्रुप, मोठ्यांचा ग्रुप, राजकारणी आणि महिला बचत गटाचे एकूण राजकारण आणि करामती यावर ही स्टोरी बेतलेली आहे. एकूण 15 सीजनमध्ये ही स्टोरी येणार आहे. प्रत्येक सीजन 5 भागांचा असेल.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता याचे सीजन https://www.youtube.com/c/Pikcharwala या चॅनेलवर प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. बाबुर्डी बेंद (नगर-दौंड महामार्ग, ता. / जि. अहमदनगर) येथे संपूर्ण सिरीजचे शुटींग केलेले आहे. पहिला सीजन शुक्रवारी (दि. 18 जून 2021) रोजी प्रसिद्ध होईल.

यामधील कलाकार आणि इतर माहिती अशी

  • : 1. निर्माती : पिक्चरवाला
  • 2. युट्युब चॅनेल : https://www.youtube.com/c/Pikcharwala
  • 3. कथा-पटकथा-दिग्दर्शक : सचिन मोहन चोभे
  • 4. कोरिओग्राफर : उद्धव काळापहाड
  • 5. व्हिडिओ एडिटिंग : राम काळापहाड
  • 6. कॅमेरामन : सुनील झगडे, विनोद सूर्यवंशी, विकास कदम
  • 7. कलाकार : श्रीमंत चोभे, भाऊसाहेब चोभे, डॉ. सुधीर चोभे, निलेश चोभे, श्याम रोकडे, माधुरी चोभे, सचिन चोभे, करण चोभे, शिवम चोभे, रोहित मोहिते, दत्ता चोभे, वैष्णव चोभे, शुभम चोभे, मयूर मोहिते, गौरव निमसे, विशाल चोभे, शंभूराजे चोभे आदि