१५ जून पासून आशा कर्मचारी पुकारणार बेमुदत संप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही.

यांसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी १५ जून २०२१ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनाकाळात आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी अत्यंत महत्वाची कामे केली.

राज्य सरकारची माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वे चे कामही अतिरिक्त मोबदला न घेता केले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे.

यामुळे अकोले तालुक्यातील आशांनी एकत्र येत या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन आज प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेटे यांना दिले.

कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे.