दुसऱ्या आठवड्यात नगर जिल्हा अनलॉकच्या ‘या’ टप्प्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्य शासनाने दिनांक ४ ते १० जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा प्रथम स्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच दिनांक ०६ जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील.

नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी,

असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना उपाययोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला.

त्यावेळी ते बोलत होते. निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत.

त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जावी,

असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी.