वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ढोल बजाव आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शासकीय योजनेअंतर्गत 10 लाख रकमेचे पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता डांबरी दुरुस्ती करणे असे काम मंजूर होते सदरचे काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत करण्यात येत होते व त्यासाठी कामाचा ठेका देण्यात आलेला होता

परंतु सदरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम न करता प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांनी कागदोपत्री झाल्याचे भासून खोटे मोजमाप पुस्तक क्र.4358 मध्ये लिहिले व खोटे देयक तयार करून शासनाची 10 लाख रुपयांची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मोजमाप पुस्तक मधील प्रत्यक्षात काम झाले

नसतानाही खोटे मोजमापे लिहिले असून ती मोजमापे बरोबर आहे यास दुजोरा देणारी तपासणीची स्वाक्षरी कार्यकारी अभियंता यांनी केली आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी अंतर्गत शासनाच्या विविध योजना चे करोडो रुपयाची विकास कामे राठोड प्रभारी उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या अंतर्गत सुरू आहेत

जर 10 लाख किमतीचे 100% खोटे बिल इतक्या राजरोसपणे काढून घेत असेल तर त्यांनी आजपर्यंत गोरगरीब जनतेसाठी चा शासनाचा किती करोडो रुपयांचा निधी ठेकेदार सोबत संगनमताने स्वताचया घशात घातला असेल.

आर.डी. राठोड यांचा हा भ्रष्टाचार व अपहार सबळ पुराव्यानिशी पंचायत समिती पाथर्डी चे जबाबदार लोकप्रतिनिधी तसेच पागोरी पिंपळगाव व सोमठाणे नलवडे येथील ग्रामस्थांनी माध्यमातून निदर्शनास आणून सुद्धा तसेच वरील सर्वांना मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पुराव्यासहित लेखी तक्रार दाखल केली आहे

तरीसुद्धा आज सुमारे दोन महिने उलटूनही जिल्हा परिषद शासनाने प्रभारी उपअभियंता राठोड यांच्यावर कारवाई न करता त्यांचे भ्रष्ट कारभारात प्रोत्साहन दिलेले आहे. जिल्हा परिषद अहमदनगर येथील प्रशासन मात्र आर.डी. राठोड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे असतानाही दोन महिने उलटून गेल्यावर ही कारवाई न करता त्यांना करोडो रुपयाचा शासनाचा पैसा स्वतःच्या घशात घालून घेण्यास मदत करीत आहे

त्यामुळे प्रभारी उपअभियंता आर.डी.राठोड व शाखा अभियंता यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, दिलीप साळवे, विनोद गायकवाड, भाऊसाहेब कोहकडे,

सागर चाबुकस्वार, प्रवीण जाधव, सुनील गट्टाणी, रवी भिंगारदिवे, विवेक विधाते आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अहमदनगर येथे येऊन आर.डी.राठोड याने त्यांच्या विरोधातील कारवाई ची फाईल भ्रष्ट पद्धतीने आर्थिक व्यवहार करून थांबवली आहे व ती फाईल कदाचित शासनामार्फत नाहीशी करण्यात प्रयत्न केलेला आहे

व दरम्यान सदर भ्रष्टाचाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे ता पाथर्डी जिल्हा अहमदनगर या रस्त्याचे काम करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. व आर.डी.राठोड यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्या विरोधातील कारवाई ची फाईल तात्काळ मागून घ्यावी

तसेच भ्रष्टाचाराचे पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे या रस्त्यावर काम सुरु करु नये म्हणून ताकीद देण्यात यावी असे न केल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल

व उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अहमदनगर जिल्हा परिषद च्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.