‘तुमच्यात हिंमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या.

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले होते.

दरम्यान अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी पत्रकार परिषद घेत आज आपली भुमीका स्पष्ट केली. निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी ‘अगस्ती’चे संचालक मंडळ ‘टोळी’ असल्याचा, तसेच कारखाना शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

जिल्हा सहकारी बँकेकडे अर्ज देऊन ‘अगस्ती’ला कर्ज देऊ नये, अशी मागणी करीत राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. त्यावर (ता. १४) कारखान्यावर पिचड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, मीनानाथ पांडे व सर्व संचालक उपस्थित होते यावेळी बोलताना पिचड म्हणाले, ‘तुमच्यात हिंमत असेल, तर माझाही राजीनामा घ्या. शेतकऱ्यांच्या बांधिलकीतून आम्ही काम करतो.

यापूर्वी चुकीच्या पद्धतीने कारखाना बंद पडला होता. मात्र तो पुन्हा उभा केला. ज्यांनी पिठाची गिरणी चालवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. ‘अगस्ती’चे कर्ज फेडून तो सक्षमपणे चालवूच,’’ असा विश्‍वास पिचड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

तसेच राज्यातील सर्वच कारखान्यांवर कर्ज आहे. ‘अगस्ती’ त्याला अपवाद नाही. आम्ही राजीनामे दिले आहेत. विरोधकांनी हिंमत दाखवून कारखाना चालवावा असे आव्हानही त्यांनी केले आहे.