काय चौकशी करायची ती करा, आम्ही गावोगावी जाऊन…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी काल राजिनामे दिले. ‘कारखाना बंद पाडून खासगीकरणीचा घाट घातला जात आहे; मात्र अगस्ति कारखाना कदापीही मोडू देणार नाही.

यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल’ असा इशारा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला आहे.

अगस्ति सहकारी साखर कारखाना संचालक यांनी राजीनामे दिल्यानंतर कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिचड बोलत होते.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभवराव पिचड, ज्येष्ठ संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, रामनाथ बापू वाकचौरे, कचरु शेटे, अशोकराव देशमुख, मीनानाथ पांडे, भाऊसाहेब देशमुख,

अशोकराव आरोटे, राजेंद्र डावरे, मच्छिंद्र धुमाळ, महेशराव नवले, सुनिल दातीर, बाळासाहेब ताजने, मनिषा येवले, कार्यकारी संचालक एकनाथ शेळके व सुधाकर देशमुख उपस्थित होते.

संचालकांनी राजिनामे दिल्यानंतर पिचड म्हणाले, हा कारखाना ज्यांना चालवायचा आहे, त्यांनी तो चालवावा; पण अगस्ती खासगी करण्याचा कुणाचा घाट असेल तर आपण तो हाणून पाडू.

अगस्ती कदापी मोडू देणार नाही. काय चौकशी करायची ती करा, आम्ही गावोगावी जाऊन सभासदांशी संवाद साधू, असे ते म्हणाले.