महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गुटख्याचा साठा जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरु आहे.

याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून या अवैध व्यवसाय करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. नुकतेच संगमनेरात पुन्हा एकदा गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीस बंदी असताना संगमनेर तालुक्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सुरु आहे. गुरुवारी सकाळी अहमदनगरच्या अन्न व भेसळ प्रशासनाने शहरातील पदामानगर येथे छापा टाकला. याठिकाणी सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात बेकायदेशीर गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती अहमदनगर अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

या खात्याच्या पथकाने सकाळी शहरात पद्मानगर परिसरात नरसय्या पगडाल यांच्या घरात छापा टाकल्याने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला. सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा हिरा गुटखा साठा जप्त केला आहे.

वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये हिरा कंपनीसह अन्य गुटखा आणि त्यात वापरल्या जाणार्‍या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

तो जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. साठा करणाऱ्या पगडाल यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.