स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते वानर पोहचेल थेट विजेच्या पोलवर

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची मोठी वाताहत सुरु असलेली पाहायला मिळते आहे. या प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे.

व यातूनच काहींना काही दुर्घटना घडत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नुकतेच देवठाण मध्ये एक वानर कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका म्हणून थेट विजेच्या पोलवरच चढले.

महावितरणच्या वायरमनने तात्काळ वीज पुरवठा खंडीत केल्याने सुदैवाने या वानराचा जीव वाचला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील देवठाण शिवारातील जंगलात सिन्नर नगरपरिषदेने अनेक मोकाट कुत्रे आणून सोडलेले आहेत.

भुकेने व्याकुळ झालेले हे मोकाट कुत्रे वन्य प्राण्यांवर सामुदायिकपणे हल्ला चढवतात. बुधवारी सकाळी कुत्र्यांनी वानर पाहिले अन त्याचा पाठलाग सुरू केला.

हे वानर घाबरून पळत असताना जवळच असलेल्या 11 केव्ही या मेनलाईन च्या खांबावर चढले. त्याच्या सुदैवाने महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने तातडीने विद्युत उपकेंद्रात फोन करून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे त्याचा जीव वाचला.