अपघातानंतर सुमारे एक तास तो तरुण रस्त्यावरच होता पडून… अखेर प्राणज्योत मालवली

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात अनलॉक नंतर रस्ते पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले आहे. ठिकठिकणी वाहनांची वर्दळ वाढली आहे.

यातच सर्वच प्रकारच्या वाहनांवरील प्रवास बंदी हटवल्यानंतर रस्त्यानावरून वाहने सुसाट धावू लागली आहे. आणि आता त्याचपाठोपाठ अपघाताच्या घटना देखील घडू लागल्या आहे.

नुकतेच नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर परिसरात एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुण ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इमामपूर येथील बहिरोबा मळा येथून वाकी वस्तीकडे वळत असताना औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या बसने धडक दिल्याने

गोरक्षनाथ दत्तात्रय लवांडे (२६ रा. बहिरवाडी, ता. नगर) हा युवक ठार झाला. दुचाकी व बोदवड-पुणे बस यांच्यामध्ये अपघात झाला.

अपघातात जखमी झालेल्या गोरक्षनाथ लवांडे यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. अपघातातील जखमी तरुण एक तास रस्त्यावर पडून होता.

जेऊर येथील १०८ रुग्णवाहिका बाहेर पाठविण्यात आल्याने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. केडगाव येथील रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने जखमीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.