जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे पाच हजाराहून अधिकांचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षाहून अधिक काळ कोरोनाने हाहाकार माजवला होता. यातच पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घातक असलेली दिसून आली.

दुसर्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याकाळात बाधितांची संख्येने देखील रेकॉर्ड केले तर दुसरीकडे मृतांची आकडेवारी देखील भीतीदायक होती.

यामुळे याकाळात मृत्यूचे प्रमाण देखील मोठे वाढलेले दिसून आले. नुकतेच जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार 338 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात गुरूवारी 392 मृतांची नोंद झाली.

दरम्यान करोना रुग्णसंख्येत 679 रुग्णांची भर पडली असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता तीन हजार 447 इतकी झाली आहे.

तसेच 681 रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के इतके झाले आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर जिल्हा अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र अद्यापही तिसऱ्या लाटेचा चोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे बेजाबदारीने वागू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.