झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. यातच अनेक कारणे देखील समोर आली आहे.

मात्र अनेकदा नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात पुन्हा एका आत्महत्येची नोंद झाली आहे.

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे दिगंबर शिंदे या तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत युवराज गुलाब शिंदे यांनी सुपा पोलीस स्टेशनला माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिगंबर शिंदे याने वाळवणे येथील घराच्या समोरील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

युवराज शिंदे यांच्या माहितीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल कुटे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

युवराज शिंदे यांच्या फिर्यादीवरून प्रथमदर्शनी सुपा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल एस. एन. कुटे पुढील तपास करत आहेत.