६० वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- माझ्या घरा समोर भांडण करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील कुसूमबाई पवार या ६० वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करून मारहाण केल्याची घटना दिनांक २० जुलै रोजी घडलीय.

या बाबत पोलिसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुसूमबाई बाळासाहेब पवार राहणार आरडगांव ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान आरडगांव येथे कुसूमबाई पवार यांच्या घरा समोर भांडण चालू होते.

तेव्हा कुसूमबाई पवार या आरोपींना म्हणाल्या की, तुम्ही लिलाबाईला कशाला मारहाण करता. तुम्ही माझ्या घरासमोर भांडण करु नका. असे म्हणाल्याचा राग येवुन यातील आरोपींनी कुसूमबाई पवार व लिलाबाई यांना शिविगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण केली.

तसेच आरोपीने कुसूमबाई पवार यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. कुसूमबाई पवार यांच्या फिर्यादीवरून अर्चना अनिल गायकवाड, रा.राहुरी गयाबाई केरु माळी रा.आश्वी ता. संगमनेर,

गयाबाई हिची मुलगी पुनम रा.दत्तनगर राहुरी, गयाबाई हिची मुलगी सोनम रा.राहुरी फॅक्टरी ता. राहुरी. या चार जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र डावखर हे करीत आहेत.