‘या’ आमदारास ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना काळात मतदारसंघासह महाराष्ट्रात केलेल्या सर्व कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले.

त्यामुळे आमदार पवार यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे जगभरातील शंभर देशांमध्ये ग्लोबल प्लीज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत कोरोनाच्या काळात प्रभावी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे.

सदर जागतिक उपक्रमात आमदार पवार यांचे कार्य देखील नोंदवले गेले आहे. विविध कामांची दखल घेत लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने आमदार रोहित पवार यांचा गौरव केला आहे.

वर्ल्ड बुक ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेबूब सय्यद, वर्ल्ड बुक रेकॉर्डचे होल्डर आदम सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे कर्जत-जामखेड मतदार संघात आनंद व्यक्त केला जात असून आ.पवार यांचे जनतेतून अभिनंदन होत आहे.