खंडणी द्या अन्यथा हातपाय तोडून जिवे ठार मारू; खंडणीखोरांची अधिकाऱ्याला धमकी

file photo

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  वन अधिकार्‍याकडून खंडणी स्विकारताना खंडणी बहाद्दर टोळीला रंगेहाथ पकडल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली. ही कारवाई लोणी पोलिसांनी पार पाडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने सोमवारी (दि.19 जुलै) रोजी राहाता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे.

तसेच तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत मला सर्व माहिती असून 25 लाखांची खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती 12 लाखांची करत ती दिली नाही तर हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 20 जुलै रोजी 2 लाख रुपयांची खंडणी घेऊन ये असे धमकावले.

याबाबतची माहिती वनरक्षक बेडवाल यांनी पोलिसांसह वरिष्ठांना दिली. त्यानुसार खंडणीखोरांसाठी सापळ्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पथक हुसेन दादाभाई शेख याच्या घरी आले.

पोलिसांनी बेडवाल यांना मागणी प्रमाणे सापळ्यातील रक्कम 1 लाख 20 हजार रूपयांची रक्कम देऊन घरात पाठविले. तेथे अनिल गोपीनाथ आढाव (रा. विरोबा लवनरोड, लोणी खुर्द, ता. राहाता) सलीम बाबामियॉ सय्यद (रा माळहिवरा, गेवराई)

यांनी स्वीकारल्याने सापळ्यातील नियोजनाप्रमाणे त्यांना रोख रक्कम 1 लाख 20 हजार रूपये रोख रक्कमेसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात येऊन या तिघांना जरबंद केले. वनरक्षक बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.