भाजपचे ‘हे’ ज्येष्ठ नेते शुक्रवारी नगरमध्ये येणार

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी (दि.23) नगर शहराच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नगर शहर, दक्षिण व उत्तर नगर जिल्हा भाजपचा संघटनात्मक आढावा बूथ रचनेची माहिती घेणार आहेत. मनपा विरोधी पक्षनेतापदाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मनपा विरोधी पक्षनेतापदासाठी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभापती मनोज कोतकर यांची नावे चर्चेत आहेत.

विरोधी पक्षनेतापदाचा निर्णय भाजप प्रदेश स्तरावरून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाटील हे आता नगर शहरात येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.