जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक देखील लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे.

यातच जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर नेहमीच वाद झाल्याचे पाहायला मिळते. आता लसीसाठी चक्क आंदोलन केले जाऊ लागले आहे.

महाराष्ट्रात लसीकरणबाबत विक्रम रचल्याचे दावे केले जात आहे. आरोग्य विभाग सांगते की राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त लसीकरण झाले आहे,

मात्र अहमदनगर शहरात लसीकरण अत्यंत संथ गतीने सुरु आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ ७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

या आठवड्यात तीन दिवस लस उपलब्ध झाली नाही. लसीकरण बंद राहिले. नागरिक वैतागले आहेत. खासगी रुग्णालयात पैसेही भरले आहे.

मात्र त्यांना लस देण्यात आलेली नाही. यालाच वैतागून नागरिक जागरूक मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लसीकरण जर चालू ठेऊ शकत नसेल तर लॉकडाऊन ही चालू ठेऊ नका असे फलक लावत आंदोलन करण्यात आले.