स्वतंत्रदिनाच्या दिवशी महिलासंह ग्रामस्थ करणार उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द गावातील समस्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुटत नसल्याने महिलांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

आणि याच पार्श्वभूमीवर महिलांसह ग्रामस्थ यांनी दि.१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, केंदळ खुर्द गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गाव अंतर्गतरस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित घरकुल प्रश्न,

पिण्याच्या पाण्यावरील अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारी बंद करण्यात यावे या बाबतचे लेखी निवेदन दि .२१ मे रोजी ग्रामपंचायकडे देण्यात आले होते.

परंतु कुठलेही उत्तर न मिळाल्याने १३ जुलै रोजी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे महिलांसह ग्रामस्थांनी दि १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

यावेळी माणिक आढाव, गहिनीनाथ राशिनकर, प्रकाश आढाव, सचिन गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, दीपक आढाव, विजय आढाव, बाबासाहेब आढाव, सोमनाथ झिने, लक्ष्मण जाधव, लहानु जाधव,

सुरेश जाधव, गुलाब गोलवड, विलास मोरे, ताराचंद केदारी, बबन केदारी, सुरेश गोलवाड,अनिल माळी, विजय आढाव, किशोर जाधव, भरत माळी, सुनील जाधव, इंदुबाई केदारी अनिता पाटोळे ताई आढाव संगीता मनतोडे सुरेखा जाधव संगीता केदारी आदि उपस्थित होते.