खुशखबर ! जिल्ह्यातील हे धरण झाले ‘ओव्हर-फ्लो’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  भंडारदरा परिसरात सर्वत्र डोंगरांवरून धबधबे कोसळताना दिसू लागले आहेत. काही ठिकाणी भात आवणीच्या कामाला वेग आला आहे. कृष्णावती नदीला पूर आला आहे. वाकी प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे.

मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. अंबित पिंपळगाव खांड पाठोपाठ कोथले धरण ओव्हर फ्लो’ झाले आहे. मुळा नदीतून सकाळी पाच हजार449 क्यूसेक वेगाने पाणी वाहतेय.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर व रतनवाडीत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात ४२९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली.

भंडारदरा धरण ५२ टक्के, तर कोथळा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने डोंगरांवरून धबधबे कोसळू लागले आहेत. भंडारदरा धरणाचा साठा पाच हजार ५९० दशलक्ष घनफूट झाला होता.

दरम्यान, आंबीत, पिंपळगाव खांडपाठोपाठ कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’ झाले आहे. भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र तसेच कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

जोरदार पावसाने धरणसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी भातपिकाची लावणी सुरू केली आहे.