अहो तुमच्या दुकानाच्या कुलूपाजवळ काहीतरी गडबड झालीये…

file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्गामध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

नुकतेच कोपरगाव तालुक्यात एका दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. दुकानाचे कुलूप तोडून आठ लाखांच्या तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील गाळा क्रं .11 मधील रामदास माधव राजुडे यांच्या मालकीच्या श्रीराम मोटर्स या दुकानात ही चोरीची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील व्यापारी व इलेक्ट्रीक मोटार दुरुस्तीचा व्यवसाय असलेले दुकानदार रामदास राजुडे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी आपले दुकान बंद करून गेले असता

आज सकाळी त्यांना एक फोन आला व त्याने तुमच्या गाळ्याचे शटर लावण्याचे कुलूपाजवळ छंणीने तोडून आत काही तरी गडबड झालेली दिसत असल्याचे सांगितले. राजुडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता

त्याठिकाणी अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक मोटार भरण्याची तांब्याच्या धातूची सुमारे सातशे ते आठशे किलो तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आढळून आली आहे. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कोपरगाव शहर पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.