file photo

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे.

पण नद्यांना पूर आल्याने धोका अजूनही कायम आहे. आशा गंभीर स्थितीत हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गुजरातमध्ये २३ जुलैला काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल या पावसाची तीव्रता २४ जुलैला वाढेल, असा असा अंदाज दिल्लीतून हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये आधीच हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.पश्चिम घाटात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर पाऊस ओसरेल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.