अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- वांबोरी ग्रामपंचायतीत काल सकाळी ना. तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपचा चांगलाच समाचार घेतला यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले कि, भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही बसविला नाही, असा टोला तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना नाव न घेता लगावला.
वांबोरी गावाला व वाड्यावस्त्यांसाठी थेट मुळा धरणातून स्वतंत्र पाणीयोजनेसाठी जलजीवन पाणीयोजनेच्या माध्यमातून आराखडा तयार केला आहे. त्यासाठी 28 कोटी रुपये खर्च येणार असून ते काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
नगर-वांबोरी रस्ता, स्वतंत्र पाणी योजना, सौरऊर्जा प्रकल्प, वीजप्रश्न आदींचा आढावा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला. मंत्री तनपुरे म्हणाले, नगर-वांबोरी रस्त्यासाठी मागील अर्थसंकल्पात तरतूद करून मंजुरी घेतली होती. करोनामुळे रखडलेले काम लवकरच सुरु होतील. तसेच या रस्त्याचे कामे दर्जेदार होतील, तशा सूचना दिल्या आहेत.
या भागातील पाच फिडर ओव्हर लोड आहेत. हा लोड आताच वाढलेला नाही, मागील पाच ते दहा वर्षांत काहीच न झाल्याने हा लोड वाढला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. भाजपने मागील पाचवर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे. मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. त्यांच्या आमदाराने एक ट्रान्सफार्मर बसविला नाही, असा टोलाही मंत्री तनपुरेंनी लगावला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|