Government accounts hacked : देशात सायबर गुन्हेगारीचे (Cyber crime) प्रमाण वाढत आहे. सायबर चोर सोशल मीडिया (Social Media) वरील अकाउंट (Account) किंवा इतर वयक्तिक खाती हॅकिंग करून पैसे उकळतात.
त्यामुळे अशा चोरांपासून सर्व सोशल मीडिया यूजर्स ने सावध राहणे गरजेचे आहे. कारण या चोरांकडून काही वेळा पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक केले जातात.
त्यामुळे जेव्हा सामान्य माणूस हॅकिंगचा बळी होतो, तेव्हा सायबर सुरक्षा कंपन्या लोकांना डिजिटल (Digital) जगात सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात, पण जेव्हा सरकारी वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर हल्ले होतात, तेव्हा प्रकरण थोडे गंभीर होते.
पाच वर्षांत ६०० सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर सायबर हल्ला
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंगळवारी लोकसभेत (Loksabha) सांगितले की, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची ६०० हून अधिक सोशल मीडिया खाती हॅक करण्यात आली आहेत.
अनुराग ठाकूर यांनी सरकारचे ट्विटर (Twitter) हँडल आणि ई-मेल (E-Mail) खाते हॅक झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, २०१७ पासून आतापर्यंत अशी ६४१ खाती हॅक झाली आहेत.
लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की २०१७ मध्ये एकूण १७५ खाती, २०१८ मध्ये ११४ खाती, २०१९ मध्ये ६१, २०२० मध्ये ७७, २०२१ मध्ये १८६ आणि या वर्षात आतापर्यंत २८ सरकारी सोशल मीडिया खाती हॅक झाली आहेत.
तसेच ते म्हणाले की भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दलाने (CERT-In) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.
भविष्यात असे हॅकिंग टाळण्यासाठी काय तयारी आहे?
भविष्यात अशा हॅकिंगला प्रतिबंध करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, असे विचारले असता मंत्री म्हणाले की सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे.
हे डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत सायबर धोक्यांवर आणि त्या टाळण्यासाठी नियमितपणे उपाययोजनांबाबत सूचना आणि सल्ला जारी करते. तसेच ते म्हणाले की वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप, मोबाईल/स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फिशिंग हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी CSIRT वेळोवेळी जारी केले जातात.