Successful farmer: याला म्हणतात यश! जिरेनियम शेतीतुन ‘या’ नवयुवक शेतकऱ्याने कमविले लाखों, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Successful Farmer: गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीत मोठा तोटा सहन करावा लागतं आहे.

मात्र असे असताना देखील शेतकरी बांधव (Farmers) अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपारिक पीक पद्धतीचा अवलंब करत असल्याचे आपणास बघायला मिळेल.

शेतकरी बांधव नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे अजूनही अपेक्षित असा वळलेला बघायला मिळतं नाही. मात्र जर शेतीव्यवसायात काळाच्या ओघात बदल केला गेला विशेषता पीकपद्धतीत बदल केला आणि बाजारात जे विकते तेच पिकवले तर शेती निश्चितच लाखो रुपये उत्पन्न कमवून देणारे हमीचे साधन बनेल यात तिळमात्रही शंका नाही.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या (Baramati) एका नवयुवक शेतकऱ्याने देखील पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत जिरेनियम या औषधी वनस्पतींची (Geranium Farming) शेती करून लाखों रुपये उत्पन्न कमावले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

तालुक्याच्या मौजे मुर्टी येथील रहिवाशी शेतकरी सतीश जगदाळे हे कायमच शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग आत्मसात करत असतात.

सतीश यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत अन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जिरेनियम या औषधी वनस्पतीची (Medicinal Plant Farming) शेती सुरु करून वर्षाकाठी तीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.

सतीश यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा सिद्ध होत आहे.खरं पाहता, तालुक्याचा पश्चिम भाग हा कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो यामध्ये मुर्टी गावाचा देखील समावेश आहे.

या भागात विशेषता बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. एकंदरीत पावसाच्या पाण्यावर आधारित शेती (Farming) या भागात बघायला मिळते.

मात्र, सतीश जगदाळे यांनी कमी पावसाच्या प्रदेशात देखील शेती व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न कमावले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे.

सतीश जगदाळे गेल्या चार वर्षांपासून आपल्या दहा एकर शेत जमिनीत जिरेनियम या औषधी वनस्पतीची शेती (Geranium Cultivation) करत आहेत. जिरेनियम लागवडीसाठी त्यांना एकूण 80 हजार रुपये खर्च आला आहे.

जिरायती भाग असल्याने सतीश यांनी अशा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला ज्याला पाण्याची कमी आवश्यकता भासेल. यासाठी त्यांनी शोधाशोध केली आणि शोध अंती त्यांना जिरेनियम शेतीचा पर्याय सुचला.

जिरेनियम या पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून जगदाळे आठवड्यातून दोनदा पाणी देतात. जगदाळे यांनी जिरेनियम शेती मधून वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे शिवाय त्यांनी गावातील पंधरा जणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जिरेनियम या औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल (Geranium Oil) बाजारपेठेत मोठ्या चढ्या दराने विक्री होत असते.

यामुळे जिरेनियम शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी आहे. निश्चितच जगदाळे यांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून साधलेली ही किमया इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe