Krushi News Marathi: मित्रांनो भारतात मोहरी, भुईमूग, सूर्यफूल याबरोबरच तेलबिया पिकांमध्ये तीळाचेही (Sesame) एक महत्त्वाचे स्थान आहे.
हिवाळ्यात रेवडी, तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. याशिवाय तिळापासून तेलही मिळते. आयुर्वेदमध्ये देखील तिळाला मोठं महत्व आहे. तिळाचे तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते.
तिळाची शेती (Sesame Farming) ही एक फायदेशीर शेती (Farming) ठरत आहे. भारतात हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते.
आज आम्ही शेतकऱ्यांना कमी पाण्यात आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या तिळाच्या शेतीविषयी (Sesame Cultivation) काही महत्वाची माहिती सांगणार आहोत.
तीळ शेती ही एक फायद्याची शेती आहे. मित्रांनो शेतकरी बांधव (Farmers) उन्हाळ्यात आणि खरीप हंगामात (Kharif Season) दोन वेळा तीळाची लागवड (Sesame Farming) करू शकतात.
हे कमी खर्चात आणि कमी पाण्यात घेतले जाणारे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. शेतकरी दोन्ही हंगामात तिळाची यशस्वी लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात.
उन्हाळ्यात देखील तिळाची लागवड करता येते. उष्ण हवामानात शेतात मर्यादित सिंचनाची सोय असल्यास शेतकरी तिळाची यशस्वी लागवड करू शकतात.
उन्हाळ्यात 10-15 दिवसांच्या अंतराने 5-6 सिंचनाची गरज असते, तर खरीप हंगामात पावसावर आधारित शेती आणि तणांच्या योग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन आणि नफा मिळवता येतो.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की उन्हाळ्यात तीळ मे-जूनमध्ये पेरले जाते आणि जुलै-ऑगस्टमध्ये कापणी केली जाते. म्हणजेच रब्बी आणि खरीप या कालावधीत पेरणी केली जाते.
उन्हाळी पिकांमध्ये राई, मका, ज्वारी या पिका समवेत आता तिळाची भर पडली आहे. तीळ लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत आहे.
तेलबिया पीक तज्ञ यांच्या मते, तीळ एक हेक्टरमध्ये पेरणीसाठी 5 ते 6 किलो बियाणे आवश्यक आहे. खरिपात पाऊस सुरू झाल्यावर जून ते जुलैच्या मध्यापर्यंत पेरणी करता येते.
पेरणी करताना ओळ ते ओळीचे अंतर 30 सेमी आणि रोप ते रोप अंतर 10 सेमी ठेवावे. चांगली उगवण होण्यासाठी पेरणीच्या वेळी हलके पाणी द्यावे जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.
पेरणीच्या वेळी 52 किलो युरिया, 88 किलो डीएपी आणि 35 किलो म्युरिएट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे. तण नियंत्रणासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर 15-20 दिवसांनी आणि दुसरी खुरपणी 30-35 दिवसांत करावी.
शास्त्रोक्त व्यवस्थापनाने तिळाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगला नफा मिळेल.मित्रांनो देशात महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये तिळाची लागवड केली जाते.
यातील सर्वाधिक तिळाचे उत्पादन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये होते. आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात तीळची शेती केली जाते.