Goat Farming: ऐकलंत का लखपती बनायचंय का….! कमी पैशात सुरु करा शेळीपालन, करोडोत होणार कमाई; कसं ते वाचाच एकदा

Ajay Patil
Published:

Goat Farming: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगली शेती (Farming) करायची असते, शेती व्यतिरिक्त शेतकऱ्याला पशुपालनातूनही (Animal Husbandry) पैसे कमवायचे असतात, अशा परिस्थितीत शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक उत्तम पर्याय ठरणार आहे. असं म्हणण्यापेक्षा देशातील शेतकरी बांधव शेळीपालन (Goat rearing) व्यवसायातून चांगली तगडी कमाई करत आहेत.

देशात पूर्वीपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी बांधव पशुपालन करत आले आहेत. आपल्या देशात पशूपालनातं शेळीचे पालन सर्वाधिक केले जाते. शेळीपालन हा असा एक शेतीपूरक व्यवसाय आहे जो कमी जागेत आणि कमी खर्चात सुरु करता येतो. शेळ्यांची संख्या वाढवल्यास हा व्यवसाय झपाट्याने नफा देतो.

विशेष म्हणजे शेळीपालनासाठी शासनाकडून अनुदानही मिळते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील, तर शेळीपालन सुरू करा अन निश्चितचं हा व्यवसाय तुम्हाला लखपती बनवून सोडणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शेळीपालनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी अनेक बँकांकडून कर्ज उपलब्ध आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकता. या कर्जाच्या व्याजावर शासन अनुदानही देते. शासनापकडून शेळीपालनासाठीही अनुदान उपलब्ध आहे. शेळ्या खरेदीवर खर्च झालेल्या रकमेपैकी 25-35 टक्के रक्कम शेतकऱ्याला अनुदान म्हणून मिळू शकते, अनुसूचित जाती आणि दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गातील लोकांना 33 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.

ही रक्कम अडीच लाख रुपये असू शकते. शेळीपालन व्यवसायाला कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, पत्ता आणि उत्पन्नाचा दाखला, बीपीएल कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शेळीपालन प्रकल्प अहवाल, अर्जाचे 4 पासपोर्ट आकाराचे फोटो, जमिनीच्या नोंदणीची कागदपत्रे आवश्यक आहेत.

शेळीपालन व्यवसायाय सुरु करण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज उचलू शकता. अन निश्चितचं हा व्यवसाय तुम्हाला कमी पैशात सुरु करता येणार आहे. शेळीपालन व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी अतिशय कमी जागा लागते.

त्यासाठी आवश्यक निवारा हा कमी खर्चात तयार करता येतो. शिवाय शेळ्यांच्या आहारासाठी देखील अतिशय नगण्य खर्च येतो. यामुळे शेळी पालन व्यवसाय खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे शाश्‍वत साधन बनत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe