Business Idea: अरे भावा वावर आहे ना…! ‘या’ विदेशी पिकाची शेती करा, 3 महिन्यात 30 लाख कमवा; कसं ते बघा

Ajay Patil
Published:

Business Idea: मित्रांनो भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. म्हणजेच आपला देश हा शेती (Agriculture) क्षेत्रावर अधिक अवलंबून आहे. जाणकार लोकांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा शेतीप्रधान आहे.

अशा परिस्थितीत देखील देशातील अनेक नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेतीऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीमध्ये नवयुवक शेतकरी पुत्रांना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे.

मात्र कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी पुत्रांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल घडवून आणला तर तोट्यात जाणारी शेती फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी पीक पद्धतीत बदल करणे आता अनिवार्य झाले आहे.

मित्रांनो बाजारात मागणी असलेल्या पिकांची तसेच नगदी पिकांची (Cash Crop) शेती केल्यास शेतकरी बांधवांना निश्‍चीतच लाखोंचा नफा होणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी चीया सीडच्या शेतीविषयी (Chia Seed Farming) माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आता फक्त भारतात चिया सीड या सुपर फूडची मागणी आणि वापर जास्त आहे असे नाही तर विदेशात देखील याची मागणी झपाट्याने वाढत आहे. भारतातील शेतकरी आता चिया सीड्स परदेशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागले आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सुरुवातीच्या काळात याची शेती फक्त अमेरिकेत होत होती. मात्र चिया सीड्स मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने याची मागणी आज सर्वत्र मोठी झपाट्याने वाढली आणि यांची शेती शेतकरी बांधवांसाठी देखील फायद्याचा सौदा ठरत असल्याने आता चिया सीड्स फार्मिंग भारतातील अनेक भागात केली जात आहे.

चिया सीड्स शेती कशी करावी

चिया सीड्स एक अतिशय फायदेशीर सुपर फूड आहे, जे कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात पिकवता येते.

कृषी तज्ज्ञांच्या मते, चिया सीड्सच्या शेतीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, त्याचे पीक हलक्या-तुकड्या जमिनीत घ्यावे.

सेंद्रिय पद्धतीने चिया सीड्सची लागवड करणे अधिक फायदेशीर आहे, या पिकात कीड-रोग येण्याची शक्यता जवळपास नसते.

चिया सीड्स ऑक्‍टोबर ते नोव्‍हेंबर या कालावधीत लावले जाते, त्यापूर्वी नर्सरीत चिया रोपे तयार केली जातात.

रोपवाटिकेत, चिया रोपे केवळ 15 दिवसांत तयार होतात, जी सेंद्रिय पद्धतीने पोषित शेतात लावली जातात.

इतर पिकांप्रमाणेच चिया बियांच्या पिकातही तण उगवले जाते, त्यासाठी शेतात निगराणी व तण काढणी केली जाते.

चिया सीड्सच्या पिकाला जास्त सिंचनाची आवश्यकता नसते, फक्त जमिनीत ओलावा निर्माण केल्यावर झाडे लवकर वाढतात.

त्याचे पीक तयार होण्यासाठी 110 ते 115 दिवस म्हणजे सुमारे 3 महिने लागतात.

चिया सीड्सचे पीक तयार होताच, झाडे आणि त्याच्या लोंब्या पिवळे रंग घेतात.

काढणीच्या वेळी झाडे मुळासह उपटून टाकली जातात, त्यानंतर बिया वाळवून स्वच्छ केल्या जातात.

चिया सीड्सची लागवड करण्यापूर्वी बाजारपेठेची माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून पीक विकणे सोपे होईल.

शेतकर्‍यांना हवे असल्यास ते चिया सीड्सची व्यावसायिक शेती किंवा कंत्राटी शेती देखील करू शकतात.

चिया सीड्स शेतीतून होणारी कमाई

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, एक एकर शेतात चिया सीड्स पिकवण्यासाठी 20 ते 30 हजार खर्च येतो, ज्यामध्ये बियाणे आणि मजुरीचा खर्च येतो.

उत्पन्नाबद्दल सांगायचे तर, एक एकर शेतात चियाचे सह-पीक घेण्यासाठी 1 किलो बियाणे लागते, जे तीन महिन्यांत एक क्विंटल उत्पादन देते.

मुख्य पीक म्हणून चिया बियाणे लागवड करण्यासाठी, एक एकर शेतात 4 ते 5 किलो बियाणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 6-7 क्विंटल म्हणजेच 600-700 किलो उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत चिया बियाणे 1000 ते 2000 रुपये किलो दराने विकले जातात.

अशा प्रकारे 3 महिन्यांत केवळ एक एकर जमिनीवर चियाची लागवड करून 6-7 क्विंटल उत्पादन आणि 6 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवता येतो. म्हणजे जर पाच एकर जमिनीत उसाची शेती केली तर 30 लाखांचे उत्पन्न शेतकरी बांधवांना राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe