Success Story: शेतकरी बांधव शेतीमध्ये (Farming) कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. अनेक शेतकरी बांधव (Farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने शेतीत बदल करण्याचा प्रयत्न करतात.
निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला केलेल्या बदलाचे फलित मिळत नाही, मात्र असे अनेक शेतकरी असतात ज्यांना शेतीमध्ये केलेल्या अमुलाग्र बदलाचा चांगला फायदा होत असतो. निश्चितच शेतीचे क्षेत्र हे भरपूर रिस्क असलेले क्षेत्र आहे. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखले तर निश्चितच शेतीतून देखील लाखोंची कमाई सहजरीत्या केली जाऊ शकते.
उत्तर प्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील ही बाब सिद्ध करून दाखवली आहे. खरं पाहता उत्तर प्रदेश मधील हर्दोई जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लसुनची शेती (Garlic Cultivation) करत असतात. जिल्ह्यातील बेहनदर येथील रहिवाशी शेतकरी मेवालाल देखील गेल्या अनेक वर्षांपासून लसुनची लागवड (Garlic Crop) करत आहेत. मेवालाल यांना लसूण शेती विशेष फायद्याची ठरत आहे.
यावर्षी देखील मेवालाल यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात लसुनची लागवड केली आणि कृषी विभागाच्या अनमोल असल्याने या वर्षी एका एकरात दहा लाखांची कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे या वर्षी लागवड केलेल्या लसूणमधून अवघ्या सहा महिन्यात दहा लाखांची कमाई केली असल्याने पंचक्रोशीत या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मेवालाल यांच्या लसूण पिकाचा कंद पांढरा व आकाराने मोठा असतो. सुमारे 5 महिन्यांत पीक तयार झाले असले तरी 6 महिन्यांत त्यांनी ते शेतातून काढले, त्यामुळे लसणाचा कंद अगदी परिपक्व अवस्थेत आला आहे. यामुळे त्यांच्या लसूणला बाजारात मोठी मागणी असते आणि हातोहात त्यांचे लसूण खरेदी केले जात आहेत.
त्यासाठी शेताच्या सुरुवातीपासूनच नमूद नियमानुसार तयारी केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. शेताची नांगरणी केल्यानंतर तण बाहेर काढले. सेंद्रिय पदार्थही प्रमाणानुसार शेतात टाकण्यात आले. त्यांनी शेतीमध्ये शेणखताचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर केला आहे.
जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी लसुन लागवड करण्यापूर्वी शेतजमिनीची खोल नांगरणी करावी आणि शेताचे सपाटीकरण करून शेत जमीन तयार करावी. लसणाच्या निरोगी कळ्या निवडल्यानंतर त्यांची सुमारे 15 सेमी अंतरावर ओळीत लागवड करावी. एक हेक्टर मधून 160 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा शेतकरी बांधव करत असतात.