Grape Farming : द्राक्ष शेतीचा असेल प्लॅन तर ‘या’ जातीच्याच द्राक्षाची शेती करा, लाखोंची कमाई हमखास होणार!

Ajay Patil
Published:
grape farming

Grape Farming : भारतात गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील आता उत्पन्न वाढीचे अनुषंगाने फळबाग पिकांची शेती करत आहेत.

द्राक्षे (Grape Crop) हे देखील एक प्रमुख फळपीक असून या पिकाची पूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. द्राक्षाची शेती (Grape Farming) महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय असून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी (Grape Production) संपूर्ण भारतात ओळखला जातो.

नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने नासिकला वाईन सिटी या नावानेदेखील ओळखले जाते. मित्रांनो राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव द्राक्ष बागेतून चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण ज्या शेतकरी बांधवांना नव्याने द्राक्षाची लागवड (Grape Cultivation) करायची असेल त्यांच्यासाठी विशेष आणि मोलाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण द्राक्षाच्या सुधारित जातींची (Grape Variety) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात उत्पादित केल्या जाणार्‍या काही द्राक्षाच्या सुधारित जाती.

रेड ग्लोब व्हरायटी: मित्रांनो जाणकार लोकांच्या मते द्राक्षाची ही एक सुधारित जात आहे. या जातीची फळे दिसायला गोलाकार असतात आणि द्राक्षमनीचे वजन 10 ते 16 ग्रॅम असते. या जातीच्या द्राक्षांचा रंग फिकट गुलाबी ते गडद गुलाबी किंवा तपकिरी असतो. रंग तापमानावर अवलंबून असतो. स्टोरेज दरम्यान, घड काळे होतात. जातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन चांगल्या कृषी तंत्राचा अवलंब केल्यास द्राक्षेचा आकार 40 मिमी पर्यंत आणि वजन 20 ग्रॅमपेक्षा जास्त असू शकतो.

शरद सीडलेस: मित्रांनो ही देखील द्राक्षाची एक सुधारित जात असून या जातीची द्राक्ष बाजारात मोठ्या मागणी मध्ये असतात. ही द्राक्षाची जात काळ्या आणि जांभळ्या रंगाची असते. शरद सीडलेस द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी 6 भरपूर प्रमाणात असते. शरद सिडलेस द्राक्ष लागवडीसाठी डिसेंबर आणि फेब्रुवारी हे महिने उत्तम आहेत. चवीमुळे आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे परदेशी बाजारपेठेतही याला चांगली मागणी आहे.

बंगलोर ब्लू: ही देखील द्राक्षाची एक सुधारित जात असून कर्नाटक मध्ये या जातीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या जातीचा वापर जॅम आणि जेली बनवण्यासाठी केला जातो. याच्या झाडांची पाने लहान, आकाराने पातळ आणि फळे गडद जांभळ्या रंगाची आणि दिसायला अंडाकृती असतात. त्यात 16 ते 18 टक्के सुगंधी TSS असते. हे रस आणि वाइन तयार करण्यासाठी देखील वापरले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe