Onion Cultivation : कामाची बातमी! कांदा लावताना तुम्ही तर नाही करत ना ‘ही’ चूक; कांदा लागवडीची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या

Ajay Patil
Published:
onion cultivation

Onion Cultivation : कांदा हे एक नगदी पीक (Cash Crop) आहे. कांद्याची लागवड (Onion Farming) खरे पाहता संपूर्ण भारतवर्षात केली जाते. मात्र आपल्या राज्यातील कांदा लागवड विशेष उल्लेखनीय असून राज्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.

आपल्या राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच कोकण जवळपास सर्वत्र कांद्याची (Onion Crop) शेती केली जाते. विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी बांधव (Onion Grower Farmer) कांद्याच्या लागवडीतून चांगला बक्कळ पैसा देखील कमवत आहेत.

मात्र याच्या शेतीसाठी (Farming) काही खास पद्धतींचा अवलंब केला जातो. आपल्या राज्यातील नाशिक, सोलापूर, पुणे आणि धुळे या जिल्ह्यात कांद्याची लागवड अधिक असल्याचे जाणकार लोक नमूद करतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आपल्या महाराष्ट्रात आहे. लासलगाव येथे कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

अशा परिस्थितीत कांदा पिकाचे महाराष्ट्रातील स्थान आपल्या लक्षात आलेच असेल. आज आपण महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक आणि तीनही हंगामात उत्पादित केले जाणारे पीक म्हणजेच कांदा पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड कशी करायची याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

आधी कांद्याच्या जाती जाणून घ्या 

मित्रांनो जाणकार लोकांच्या मते कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन (Farmer Income) प्राप्त करण्यासाठी त्या पिकाचे चांगले सुधारित वाण (Onion Variety) लागवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. कांदा पिकापासून देखील चांगले उत्पादन घेण्यासाठी त्याच्या सुधारित जातीची लागवड करणे महत्वाचे राहणार आहे.

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की कांद्याच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी उद्याच्या सुधारित वाणाच्या प्रमाणित बियाण्यांची लागवड केल्यास कमी खर्चातही अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येते. तसेच सुधारित जातीच्या कांद्याची लागवड केल्यास रोगराई देखील कमी प्रमाणात येत असते. त्यामुळे उत्पादन खर्चात साहजिकच बचत होणार आहे.

मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, कांद्याची बसवंत-780 ही जात आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाते. ही जात सर्वात प्रगत जात म्हणून प्रसिद्ध आहे. या जातींचे रोप लावल्यानंतर 100 ते 110 दिवसांच्या दरम्यान कांदा पीक काढणीसाठी तयार होत असते. कांद्याच्या या प्रगत जातीपासून 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा जाणकार तसेच कांदा उत्पादक शेतकरी बांधव करत असतात.

याशिवाय एम-53 जातीची गणना देखील कांद्याच्या सुधारित आणि प्रगत जातींमध्ये केली जाते. या जातीची देखील आपल्या महाराष्ट्रात शेती विशेष उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी बांधव या जातीच्या कांदा पिकातून चांगली कमाई देखील करत आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याची ही जात लागवड केल्यानंतर 100 ते 150 दिवसांत काढणीसाठी तयार होते. या जातीचा कांदा लाल चमकदार असतो. जाणकार लोकांनी तसेच कांदा उत्पादक शेतकरी बांधव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कांद्याची ही प्रगत जात 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देण्यास सक्षम आहे. निश्चितचं या जातीतून देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

माती आणि हवामानाची काळजी घ्यावी लागणार बर 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात कांदा लागवड एकूण तीन हंगामात केली जाते. खरीप हंगामातील लाल कांदा रब्बी हंगामातील रांगडा कांदा आणि उन्हाळी हंगामात देखिल कांद्याची लागवड केली जाते. मात्र असे असले तरी जाणकार लोकांच्या मते हिवाळी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांदा पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. या कालावधीत कांदा पिकावर रोगांचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनात वाढ होत असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

जाणकार लोकांनी तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदा लागवडीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात योग्य आहे. या कालावधीत कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी बांधवांनी जमिनीची पूर्वमशागत करून सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. त्यानंतर कांदा लागवड करावी. मित्रांनो ज्या जमिनीत पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीत कांद्याची लागवड करण्याची शिफारस केली गेली आहे.

मित्रांनो आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या राज्यातील अनेक शेतकरी बांधव कांद्याची क्षारीय आणि पाणथळ जमिनीत लागवड करतात. जे की कांदा पिकासाठी चांगले नसते. ही माती कांदा लागवडीसाठी अनुकूल नसते. यामुळे अनेकदा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना उत्पादनात घट दिसून येते.

कांदा पीक व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या बाबी

जाणकार लोकांच्या मते, कोणत्याही पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी खतांचा समतोल प्रमाणात वापर करावा लागतो. म्हणजे खतांचा जास्त वापर किंवा कमी वापर पिकासाठी हानिकारक ठरू शकतो. खतांचा समतोल प्रमाणात वापर केल्यास जमिनीसोबतच पिकालाही पोषण मिळते परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होते.

मित्रांनो या ठिकाणी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कांदा पिकासाठी माती परीक्षणाच्या आधारेच खतांचा वापर करावा.

आपण इच्छित असल्यास, आपण कांद्याची सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करताना गांडूळ खत आणि जीवामृत वापरून कांद्याचे खूप चांगले उत्पादन घेऊ शकता.

शेतात कांदा लागवडीच्या एक महिना आधी शेणखत टाकून माती नांगरून शेत तयार करावे.

पेरणीपूर्वी बियाणे उपचार करावेच…!

तज्ज्ञांच्या मते, कोणतेही पीक पेरण्यापूर्वी त्यावर बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. बिजप्रक्रिया किंवा बीजोपचार केल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा जाणकार करत असतात. कांदा पिका बाबत देखील काहीसं असंच असून कांदा बियाणं पेरणी करतांना त्यावर बिजोउपचार करावे लागणार आहेत.

कांदा पिकासाठी 50 किलो NPK खताचा वापर अनुक्रमे बियाणे किंवा कांद्याचे कंद किंवा बियांवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो.

कांदा पिकामध्ये सिंचनालाही खूप महत्त्व आहे, त्यामुळे पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे किफायतशीर व अधिक फायदेशीर आहे. यामुळे पाण्याच्या वापरात बचत होते शिवाय उत्पादनात वाढ होते.

कांदा काढणी करताना देखील काळजी घ्या बर 

कांद्याच्या बहुतेक वाण लावणीनंतर 90 ते 110 दिवसांच्या दरम्यान पिकण्यास तयार असतात, परंतु बरेच शेतकरी कच्चे पीक किंवा जास्त पिकलेले पीक काढतात. ज्यामुळे पीक उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

तज्ज्ञांच्या मते, पेरणीच्या 3 ते 4.5 महिन्यांत कांदा काढला पाहिजे. त्यासाठी विळ्याच्या साहाय्याने माती मोकळी करून कांदा काढला पाहिजे. कांदा काढणी केल्यानंतर 3 ते 5 दिवस शेतात उघडी ठेवली जातात.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कांद्याची पात पिवळी पडण्याच्या आणि गळण्याच्या वेळीच कांदा काढणीचे काम सुरू केले पाहिजे कारण हे पीक अशा वेळी 60 ते 75% पर्यंत तयार होत असते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe