Business Idea : शेतकरी पुत्रांनो नोकरीला ठोका राम-राम! 25 हजारात सुरु करा ‘हा’ शेतीमधला व्यवसाय, 3 लाखांपर्यंत कमाई होणार

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने बदल बघायला मिळत आहेत. आता शेतकऱ्यांचा (Farmer) शेतीकडे (Agriculture) पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशातील शेतकरी बांधव पारंपरिक पिकांशिवाय (Traditional Crop’s) दुसऱ्या पिकांची शेती करत नव्हता.

पारंपारिक शेती पुरताच शेतकरी बांधव मर्यादित होता. यामुळे शेतकरी बांधवांना पारंपारिक पिकांच्या उत्पन्नातून (Farmer Income) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवने देखील मोठे मुश्किल बनत असे. मात्र आजच्या या आधुनिक युगात शेतकरी बांधव देखील आधुनिक पद्धतीने विचार करू लागला आहे.

आता शेतकरी बांधव पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत असून आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. यामुळे आज भारतात शेती व्यवसाय नोकरी-व्यवसायापेक्षा अधिक फायदेशीर व्यवसाय बनला आहे. हेच कारण आहे की आता नवयुवक देखील शेतीकडे विशेष आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो आता आपल्या देशातील शेतकरी बांधव शेतीसोबतच मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुटपालन आदी व्यवसायातून आपले उत्पन्न दुप्पट करत आहेत. यासोबतच आता शेतकरी बांधवांना मोत्याची शेती म्हणजेचं पर्ल फार्मिंग (Pearl Farming) करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जात आहे.

जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी शेती सोबतच पर्ल फार्मिंग केले तर त्यांना कमी खर्चात अधिक कमाई होणार आहे. असं सांगितलं जातं की पर्ल फार्मिंग व्यवसायात (Pearl Farming Business) 25 हजार रुपये खर्च केल्यास यातून शेतकरी बांधवांना तीन लाखांपर्यंतची कमाई सहजरीत्या मिळणार आहे. अशा परिस्थितीत हा शेती पूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण पर्ल फार्मिंग विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मोतीला आहे मोठी मागणी 

मित्रांनो अलीकडे मोतीला बाजारात मोठी मागणी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोत्यांची शेती हा अतिशय लाभप्रद व्यवसाय ठरणार आहे. अलीकडे मोत्यांपासून अनेक मौल्यवान दागिने बनवले जातात, जे आंतरराष्ट्रीय बाजारात करोडोंना विकले जातात. याशिवाय अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांमध्येही मोत्यांचा वापर केला जातो. 

अशी करा मोत्यांची शेती

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, समुद्री जिवंत ऑयस्टरपासून म्हणजे जिवंत शिंपल्यांपासून मोती मिळतात. मात्र आता काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागल्याने आता कृत्रिम पद्धतीने मोती तयार केले जाऊ लागले आहेत. आता शेतकरी बांधव तलावामध्ये ऑयस्टरचे संगोपन करून मोती तयार करू शकतात. लहान प्रमाणात मोत्यांची शेती सुरू करण्यासाठी 500 चौरस फूटचा एक तलाव किंवा टाकी पुरेशी असते. या तलावात सुमारे 100 शिंपल्यांचे संगोपन केल्यास एका शिंपल्यामागे दोन मोती तयार होऊ शकतात. मात्र मोत्यांच्या शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रशिक्षणही आवश्यक आहे.

मोत्याच्या शेतीतून उत्पन्न किती मिळणार बर 

योग्य प्रशिक्षण घेऊन पर्ल फार्मिंग सुरू केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भारतात अलीकडे मोत्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. जाणकार लोक सांगतात की पर्ल फार्मिंग सुरू करण्यासाठी सुरुवातीला 25 ते 35 हजार खर्च अपेक्षित आहे, त्यानंतर साधारण दर्जाचा एक मोती 120 रुपये आणि चांगल्या दर्जाचा एक मोती 200 रुपयापर्यंत विकला जातो. मोठ्या स्तरावर पर्ल फार्मिंग सुरू करण्यासाठी, शेतात एका एकरचा तलाव देखील बनवता येतो, ज्यामध्ये 25,000 शिंपले टाकून मोत्याचे उत्पादन घेता येते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अनेक वेळा हवामान बदलामुळे मोत्यांची गुणवत्ता आणि उत्पादन घसरते. यामुळे शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊनच मोती शेती करावी. प्रशिक्षणासोबतच शेतकऱ्यांना त्याच्या बाजारपेठेची योग्य माहिती असायला हवी, जेणेकरून त्यांना मोती विकून चांगला नफा मिळू शकेल. तसे पाहता भारताबरोबरच परदेशी बाजारपेठेतही मोत्यांना मोठी मागणी आहे. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते मोत्यांची कंत्राटी शेती करू शकतात किंवा त्यांच्या मोत्यांची योग्य प्रकारे पॅकेजिंग, प्रक्रिया आणि ऑनलाइन मार्केटिंग करून ग्राहक जोडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe