Success Story : पत्रकार महोदय तुम्ही तर नादच केलाय थेट! ‘या’ अवलियाने पत्रकारितेवर ठेवलं तुळशीपत्र सुरु केलं बकरी पालन, आता कमवतोय लाखों

Ajay Patil
Published:
success story

Success Story : आपल्या देशात प्रत्येकालाच उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची आणि चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी (Job) करायची असते किंवा सरकारी नोकरदार म्हणून रुबाबात जगायचं असतं.

मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एक अवलिया पत्रकारिता सारखे शिक्षण घेतल्यानंतर देखील शेती आणि पशुपालन करत आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

पण तसं घडलंय आणि समाजातल्या या बदलाची पटकथा गडवरा येथील रहिवासी हिमांशू विश्वकर्मा यांनी लिहिली आहे. मित्रांनो हिमांशू यांनी पत्रकारितेचे (Journalist) शिक्षण घेतले असताना देखील पत्रकारिता ऐवजी शेती आणि पशुपालन व्यवसायाला पसंती दर्शवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिमांशूने भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशनमधून मास्टर ऑफ जर्नालिझमचे शिक्षण घेतले आहे.

मात्र चांगल्या कॉलेजमधून आणि पत्रकारितेसारखे उच्चशिक्षण घेतलेले असतानादेखील हा अवलिया आता सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि शेळीपालन (Goat Farming) करत आहे. हिमांशू यांचा प्रवास 2012 पासून सुरू होतो जेव्हा तो बरबडाजवळील सातपुडा पर्वतरांगांमध्ये काहीतरी नवीन करण्याच्या शोधात होता. काहीतरी नवीन करावे या अनुषंगाने हिमांशू यांनी सेंद्रिय शेती (Farming) करण्यास सुरुवात केली.

आता तराईतील आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करणे, सेंद्रिय शेतीचे (Agriculture) नवनवीन प्रयोग करणे आणि ते प्रयोग जवळच्या शेतकऱ्यांशी शेअर करणे हा त्याच्या दिनक्रमाचा भाग झाला आहे. हिमांशू पूर्वी टीव्ही रिपोर्टर होता, त्याने विविध टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे.

मात्र शेतीची आवड आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा असल्याने त्यांनी पत्रकारितेला राम राम ठोकला. हिमांशू यांच्या या धाडसी निर्णयाने त्याच्या जवळच्या लोकांना आश्चर्य वाटले. खरं पाहता, हिमांशू यांचा अभ्यास आणि पदवी पाहून, प्रत्येकाला त्याच्या या निर्णयाच नवलंच वाटलं.

 हिमांशू यांचे सगेसोयरे तसेच मित्रमंडळी सगळं सोडून शेती करायचा हा त्याचा निर्णय एकदम चुकीचा असल्याचे सांगत होते. पण हिमांशू यांना काहीतरी नवीन करायचे होते आणि त्या अनुषंगाने लढा देण्याची त्यांची तळमळ होती.

पशुपालनासह शेती पण केली

सेंद्रिय शेतीतून कमी उत्पादन आणि बाजारात मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीसोबतच पशुपालनही करण्याचा निर्णय घेतला. पशुपालनात त्यांना व्यावसायिक स्तरावर शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन करण्याची कल्पना सुचली. शेळीपालन व्यवसाय सुरु करण्याच्या हेतूने त्यांनी अनेक शेळीपालकांना भेट दिली आणि माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आणि अखेर 2015 मध्ये त्यांनी शेळीपालनाचे काम देखील सुरू केले.

अडचणींचा सामना केला अन मग प्रशिक्षण घेतले

व्यवसायाच्या सुरुवातीच्या पहिल्या वर्षात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मग शेवटी त्यांना शेडच्या आत शेळ्या पाळणे शक्य नसल्याचे दिसून आले. पण 2017 मध्ये मथुरा येथील सेंट्रल गोट रिसर्च इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा विचार त्यांना नव्याने सुचला. जातीत बदल करून प्रगत भारतीय जात ठेवणे, ब्रीडिंग फार्म तयार करणे, तसेच फार्मवर उत्पादित शेळ्या-मेंढ्यांचे मार्केटिंग करून जिवंत वजनाच्या आधारे विक्री करणे अशा अनेक सूचना संस्थेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी दिल्या.

स्वतःची कंपनी तयार केली 

सध्या त्यांच्या फार्मवर विविध प्रजातीच्या शंभरहून अधिक शेळ्या आहेत. त्यामध्ये सिरोही, बारबारी, सोजत, गुजरी जातीच्या पाच हजार किमतीपासून ते एक लाख रुपयापर्यंतच्या शेळ्या आहेत. सध्या जिवंत वजनाच्या आधारे शेळ्या आणि पिल्ले विकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि रु. 400 ते 700. प्रतिकिलो या दराने विकली जात आहे.

हिमांशूने शेळीपालनासाठी सातपुडा फार्म्स अँड लाइव्हस्टॉक कंपनी देखील स्थापन केली आहे, तो आता सेंद्रिय शेती तसेच शेळीपालन, देशी कुक्कुटपालन आणि पशुखाद्य, शेळ्या व इतर उत्पादने इंटरनेटच्या माध्यमातून विकत आहे. त्यासाठी त्याने www. satpuralivestock.com वेबसाइट सुरु केली आहे.

हिमांशू सांगतात की, शेळीपालन हा असा व्यवसाय आहे की जो पूर्ण झोकून आणि मेहनतीने केला तर खूप चांगला नफा मिळू शकतो. त्यांना नृसिंहपूर जिल्ह्याला शेळीपालन उद्योगाचे केंद्र म्हणून बघायचे आहे. इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच शेळीपालनाचे प्रशिक्षणही वेळोवेळी त्याच्याकडून दिले जाते. नवीन शेळीपालकांसाठी सातपुडा गोट फार्म हे मदत केंद्र म्हणून उदयास आले आहे. यासाठी त्यांना शासनाकडून अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe