Wheat Cultivation : बातमी कामाची! ‘या’ जातीच्या गव्हाची आगात पेरणी करा, रब्बी हंगामात पैशांचा पाऊस पडणार

Ajay Patil
Published:
wheat farming

Wheat Cultivation : गहू (Wheat Crop) हे असेच एक अन्नधान्य पीक आहे, जे भारतात तसेच जगभरात मोठ्या प्रमाणात उत्पादीत केले जाते. भारत हा गव्हाचा प्रमुख उत्पादक देश असल्याचे म्हटले जाते. आपल्या देशात गव्हाची मोठ्या प्रमाणात खपत आहे शिवाय गव्हाची आपल्या देशातून निर्यात देखील केली जाते. त्यामुळेच उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गव्हाची (Wheat Farming) आगात पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम सुरू असून आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गव्हाची लागवड हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

अशा परिस्थितीत गहू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत शिवाय जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. अनेक शेतकरी सप्टेंबरअखेर गव्हाच्या आगात लागवडीचे काम सुरू करतात. जाणकार लोकांच्या मते आगात गहू पेरणी करताना, चांगल्या दर्जाच्या सुधारित वाणांची (Wheat Variety) निवड करावी, जेणेकरून गव्हाचे अधिक उत्पादन मिळू शकेल.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी (Farmer) वाचक मित्रांसाठी गव्हाच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण अशा गव्हाच्या जाती विषयी जाणून घेणार आहोत ज्या जातीच्या गव्हाची पेरणी आगात केली जाते.

तीन टप्प्यांत गव्हाची लागवड केली जाते बर

कृषी तज्ज्ञांच्या मते, गव्हाची लागवड तीन टप्प्यांत केली जाते, म्हणजे गव्हाची आगात, वेळेवर आणि पसात पेरणी आपल्या देशात केले जाते. गहू पेरणीचा पहिला टप्पा 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत असतो.

दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत चालतो. शेतकऱ्यांना हवे असल्यास, सप्टेंबरच्या अखेरपासून ते 25 ऑक्टोबरपर्यंत गव्हाच्या आगात पेरल्या जाणाऱ्या वाणांची पेरणी करू शकतात. पेरणी करण्यासाठी बाजारातून गव्हाचे प्रमाणित बियाणेच खरेदी करावे.

WH 1105 :- गव्हाच्या आगात पेरणीसाठी हे सर्वात लोकप्रिय वाण आहे. WH 1105 पेरणीच्या 157 दिवसांत प्रति एकर 20 ते 24 क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकते.  या जातीच्या गव्हाच्या रोपाची लांबी देखील केवळ 97 सेमी आहे आणि कमी उंच असल्याने या जातीचे पीक वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे क्षतीग्रस्त होतं नाही.

यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. WH 1105 वाण तांबेरा रोगाविरूद्ध ढाल म्हणून देखील कार्य करते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी मुख्यतः WH 1105 जातीचे बियाणे पेरतात.

HD 2967:- HD 2967 ही गव्हाची जात भारतात आगात पेरणीसाठी योग्य असल्याचे जाणकार नमूद करतात. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की ही गव्‍हाची रोग प्रतिरोधक जात आहे, जिच्‍यामध्‍ये तांबेरा रोग लागण्‍याची शक्‍यता कमी असते. गव्हाची ही जात 150 दिवसांत उत्पादन देण्यासाठी तयार होते.

गव्हाच्या या सुधारित जाती पासून एकरी 22 ते 23 क्विंटल उत्पादन घेता येते. HD 2967 जातीची गव्हाची झाडे प्रतिकूल परिस्थितीतही वेगाने वाढतात, त्यांची लांबी सुमारे 101 सेमी असते. यामुळेच हा गहू काढल्यानंतर जास्त पेंढा बाहेर पडतो. पंजाब आणि हरियाणातील माती आणि हवामानानुसार ही जात उत्तम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe