Gahu Lagwad Mahiti : गहू पेरणी करताय ना..! मग ‘या’ पद्धतीने गव्हाचे उत्तम बियाण निवडा, उत्पादनात वाढ होणार

Ajay Patil
Published:
gahu lagwad mahiti

Gahu Lagwad Mahiti : भारतातील प्रमुख नगदी पिकांमध्ये (Cash Crop) गव्हाचे नाव अग्रस्थानी येते. भारतात गव्हाचा वापर घरगुती वापरापासून ते बेकरी उत्पादनांपर्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळेच त्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या देशात गव्हाची पेरणी (Wheat Cultivation) रब्बी हंगामात (Rabi Season) केली जाते. देशात साधारणपणे 20 ऑक्टोबरपासूनच गव्हाची पेरणी सुरू होते.

प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकातून चांगले उत्पादन (Farmer Income) घ्यायचे असते आणि चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतीच्या बियाणांची पेरणी करणे आवश्यक असते. जरी अनेक देशी आणि संकरित वाण (Hybrid Wheat) बाजारात उपलब्ध आहेत, परंतु काही वेळा काही बियाणे दुकानदार शेतकऱ्यांना (Farmer) बनावट म्हणजेच निकृष्ट गव्हाचे बियाणे देत असतात.

जनजागृतीअभावी शेतकरीही तेच बियाणे खरेदी करून त्याची चाचणी न करताच पेरणीकरतात, मात्र पेरणीनंतर काही दिवसांनी बनावट बियाणांचे सत्य बाहेर येते आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.

गव्हाच बोगस बियाणे पेरणी केल्यास अनेकदा बियाणे अंकुरत नाही तर अनेकदा बियाण्याला लोंब्याच लागत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना चांगल्या बियाण्याची ओळखत करता येणे गरजेचे आहे. यामुळे आज आपण चांगले बियाणे कशा पद्धतीने ओळखले जाते याविषयी जाणून घेणार आहोत.

अशा पद्धतीने ओळखता येणार गव्हाचे उत्तम बियाणे

लक्षात ठेवा गहू बियाणं दिसायला स्वच्छ असाव. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची माती, कचरा, खडे, दगड किंवा रासायनिक लेप दिसत असल्यास बियाणे खरेदी करू नका.

बियांचा आकार, रंग आणि पोत हे देखील गुणवत्तेचे मापदंड आहेत. यामुळे लक्षात ठेवा की गव्हाचा रंग आणि आकार एकसमान असावा.

जर बिया लहान आकाराच्या असतील तर समजून घ्या की गव्हात भेसळ झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बियाणे दुकान किंवा विक्रेत्याकडे तक्रार करू शकता.

नेहमी तणमुक्त बियाणे खरेदी करा. गव्हाच्या बियाण्यात इतर कोणत्याही पिकांच्या बिया नसाव्यात. ते पिकात तण वाढवतात.

याशिवाय बियाण्यांच्या पाकिटावर किंवा पोत्यावरील आर्द्रता, बियाण्याची परिपक्वता, उगवण क्षमता आणि बियाण्याचा कालावधी तपासून गुणवत्ता तपासता येते.

गव्हाचे बियाणे ओळखण्याची एक पारंपारिक पद्धत देखील आहे. बियाण्याची मोठी खेप खरेदी करण्यापूर्वी बियांचे नमुने पाण्यात टाकूनही पाहिले जातात.

जर गव्हाच बियाण पाण्यात भरलेल्या भांड्यात बुडवले अन ते लगेच पाण्यात बुडले तर त्याचा दर्जा चांगला राहतो आणि काही वेळ तरंगल्यानंतर बिया बुडल्या तर बियांमध्ये भेसळ असू शकते.

गव्हाचे बियाणे खरेदी करताना खालील बाबींची खातरजमा करा

दुकानदाराला गव्हाच्या बियाणांचा नमुना विचारा. गव्हाचे बी कापले किंवा तुटलेले असेल तर उगवण कमी होते आणि गहू चांगला तयार होत नाहीत. यामुळे हे बियाणे खरेदी करू नका.

नेहमी कीड आणि रोगमुक्त बियाणे खरेदी करा, जेणेकरून कीटकनाशकांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तसेच बियांचा आकार लहान किंवा बियाणं जास्त कोरड नसावा. असं बियाण जास्त जुने असल्याने उत्पादनात घट येते.

गहू पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी, नेहमी विविध प्रकारच्या बियाण्यांची पेरणी अदलाबदल करून करावी.

प्रमाणित संस्थेकडून किंवा कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बुकिंग करून बियाणे ऑनलाइन मागवता येतात.

शेतकऱ्यांना हवे असल्यास माती परीक्षणाच्या आधारे ते गव्हाचे सुधारित वाणही निवडू शकतात. यामुळे कोणतीही जोखीम न घेता चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe