Agriculture News : अरे वा, शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Ajay Patil
Published:
agriculture news

Agriculture News : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतर देखील महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी पर्याप्त वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. राज्यातील शेतकरी बांधवांना वीज दिले जाते मात्र बहुदा वीज ही रात्री दिली जाते. रात्री वीज दिली जाते आणि वीज देखील खूपच कमी वेळेसाठी उपलब्ध होत आहे. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

सोलापुरातील बार्शी मध्ये एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत सांगितले की, आपल्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी पंतप्रधान कुसुम योजना आणि मुख्यमंत्री सौर फीडर योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती देखील केली जाणार आहे. 2018 मध्ये मुख्यमंत्री सौर फिडर योजना हीं सुरू करण्यात आली होती. मात्र हीं योजना नंतर बंद झाली होती. आता ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध करण्याचा मानस शासनाचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान सौर फीडरवर वीज निर्मिती करण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न जागेचा होता. मात्र आता यावर तोडगा काढला गेला असून वीज निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमिनी घेतल्या जाणार आहेत. यासाठी शेतकरी बांधवांना हेक्‍टरी 75 हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत.

निश्चितच शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध झाली तर शेतकरी बांधवांचा उत्पन्नात भरी वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या तुटणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो खरं पाहता, शेतकरी बांधवांना शेती यशस्वीरित्या करण्यासाठी आणि शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी विजेची नितांत आवश्यकता असते. मात्र अजूनही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विजेची पर्याप्त उपलब्धता पाहायला मिळत नाही.

मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याने विजेचा प्रश्न लवकरच मिटणार असल्याचे चित्र आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन सत्यात केव्हा उतरते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe