बातमी कामाची ! शेतकऱ्यांनो शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड असत आवश्यक ; जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कस बनवायचं ? वाचा याविषयीची सर्व प्रोसेस

Ajay Patil
Published:
job card information marathi

Job Card Information Marathi : मित्रांनो भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अशा परिस्थिती देशातील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत देखील वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात.

मनरेगा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नरेगा जॉब कार्ड आवश्यक असतं. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे मनरेगाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनेत बदल देखील केला जात आहे. नुकतेच विहिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान योजनेत देखील बदल केला गेला आहे.

आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना राबवली जात असून अनुदानात जवळपास एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता विहिरीसाठी शेतकरी बांधवांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान यांसारख्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना जॉब कार्ड बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत आज आपण जॉब कार्ड कसं बनवायचं, यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो याविषयी जाणून घेणार आहोत.

जॉब कार्ड म्हणजे काय?

जॉब कार्ड हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) अंतर्गत बनवले जाणारे कार्ड आहे, जे ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसांचा रोजगार प्रदान करते. म्हणजे जे कोणतेही अकुशल श्रम करण्यास इच्छुक आहेत अशा लोकांना याच्या माध्यमातून रोजगार मिळतो. जॉब कार्ड च्या माध्यमातून गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मजुरीचे कामे मागता येतात. पंचायत स्तरावर मनरेगा योजनेंतर्गत करावयाच्या कामांमध्ये काम करण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

जॉब कार्ड लोकांच्या कामाच्या अधिकाराची हमी देते. नरेगा अंतर्गत केलेल्या कामात सहभागी असलेल्या कुटुंबाचा तपशील जॉब कार्ड क्रमांकावर नमूद केलेला असतो. म्हणजेच संबंधित व्यक्तीने कोणत्या कामात किती दिवस काम केले, त्याला एकूण किती वेतन मिळेल याची संपूर्ण माहिती त्याच्या जॉबकार्डमध्ये नोंदवली जाते. मित्रांनो जॉब कार्ड हे ओळखीच्या पुराव्यासाठी देखील उपयोगाचे आहे. जॉब कार्ड आपण भारतीय असल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे.

जॉब कार्ड च्या मदतीने नरेगा अंतर्गत मजुरी मिळते तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी देखील जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचे असते. मित्रांनो नरेगा अंतर्गत जॉब कार्डधारक व्यक्तीला 100 दिवसांचा एक आर्थिक वर्षात रोजगार मिळतो. सदर जॉब कार्डधारक व्यक्तीला 256 रुपये एवढी मजुरी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळत असते.

जॉब कार्ड कसे मिळवायचे?

जॉबकार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. मित्रांनो जॉब कार्ड बनवण्यासाठी आपण पंचायत कार्यालयात जाऊन ग्रामरोजगार सेवक यांना भेटून अर्ज करू शकता. त्यानंतर अर्ज तपासल्यानंतर अर्जदाराला जॉबकार्ड दिले जाते. जॉब कार्ड मिळविण्यासाठी, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी तुम्ही खाली पाहू शकता –

अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

आधार कार्डची छायाप्रत.

बँक पासबुकची छायाप्रत.

आधार कार्ड उपलब्ध नसल्यास रेशनकार्डची छायाप्रत.

मतदार ओळखपत्र.

जॉब कार्डचे फायदे

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नरेगा अंतर्गत मजूर म्हणून मजुरी मिळवण्यासाठी जॉब कार्ड असणं आवश्यक असतं. जॉब कार्ड असेल तरच नरेगा अंतर्गत मजुरीची कामे मिळत असतात. मित्रांनो जसं की आपण आधीच बघितलं नरेगा अंतर्गत मजूर म्हणून 256 रुपये प्रति दिवस याप्रमाणे मजुरी जॉब कार्डधारक व्यक्तीला मिळत. एका आर्थिक वर्षात जॉब कार्ड धारक व्यक्तीला शंभर दिवसाचे काम मिळत असतं. याशिवाय नरेगा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील जॉब कार्ड आवश्यक असतं. म्हणजेच शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या नरेगाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी जॉब कार्ड बंधनकारक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe