Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमध्ये नावीन्यपूर्ण अशी कामगिरी करत आहेत. राज्यातील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातुन देखील असच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे.
जिल्ह्यातील खुलताबाद शहर परिसरातील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी उत्पादित केलेले अद्रक थेट सातासमुद्रापार दुबईमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले. परिसरातून पहिल्यांदाच अद्रकची निर्यात विदेशात झाली असल्याने उत्पादक शेतकऱ्याने समाधान व्यक्त केल आहे. खरं पाहता लक्ष्मण गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरीत्या अद्रकची शेती करत आहेत.
आणि उत्पादित केलेलं अद्रक उच्च दर्जाचे असल्याने याला स्थानिक बाजारात देखील मोठी मागणी आहे. आता दुबईमध्ये देखील त्यांच्या अद्रकला चांगली मागणी असल्याचे सांगितले जात आहे. लक्ष्मण काळे यांनी सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून आपले 200 क्विंटल अद्रक 19 नोव्हेंबर रोजी दुबई येथे स्त्रीला पाठवले.
दुबईला पाठवलेल्या अद्रकला 4200 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. आणि स्थानिक बाजारात मात्र 3,800 रुपयाचा भाव चालू होता. लक्ष्मण काळे यांची म्हैसमाळ रोड खुलताबाद या ठिकाणी 16 एकर शेत जमीन आहे. ते आपल्या जमिनीत मुख्य पीक म्हणून अद्रक ची शेती करत आहेत.
त्यांनी अद्रक शेती यशस्वीरित्या फुलवली असून पिक पाहण्यासाठी दूरवरून लोक त्यांच्या बांधावर हजेरी लावतात. विशेष म्हणजे लक्ष्मण तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांना मायक्रोन्यूटन, प्लांट ग्रोथ प्रमोटर व विद्राव्य खते असे 78 प्रकारचे उच्च क्वालिटीचे प्रॉडक्ट पुरवतात. तसेच इतरांना मार्गदर्शन करतात. यामुळे इतर प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आता अद्रकचे चांगले उत्पादन घेत आहेत.
दरम्यान त्यांनी उत्पादित केलेले अद्रक जाड होते अन लांबी जास्त होती. शिवाय अद्रकचे कंद चमकदार असल्याने याला मोठी मागणी होती. यामुळेच हे अद्रक दुबईला पाठवण्यात आले. त्या ठिकाणी अद्रकला चांगला दर देखील मिळाला. खरं पाहता सातासमुद्रापार जर शेतमाल निर्यात करायचा असेल तर रासायनिक अवशेषमुक्त किंवा रेसिड्यू फ्री मालच पाठवला जातो. त्यासाठी रेसिड्यू चाचणी केली जाते.
मात्र दुबईला राहणाऱ्या अद्रकची ही चाचणी होत नाही असं लक्ष्मण यांना समजल्यानंतर त्यांनी आपलं अद्रक दुबईला पाठवण्याच ठरवलं. निश्चितच लक्ष्मण यांनी उत्पादित केलेले अद्रक उच्च दर्जाचे असल्याने दुबईला पाठवले गेले आणि त्याला चांगला दर मिळाला. शेतकरी काळे यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.