Sugarcane Farming : ऊस पिकात खोडकीडीचा प्रादुर्भाव ! ‘ही’ फवारणी करा अन मिळवा नियंत्रण, होणार फायदा

Ajay Patil
Published:
sugarcane farming

Sugarcane Farming : भारतात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात तर याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात तर राज्याने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याला देखील धोबीपछाड दिली आहे. यावरून आपल्याला महाराष्ट्रात उसाची लागवड किती मोठ्या प्रमाणावर होते याचा अंदाज बांधता येतो.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात मोठ्या प्रमाणात उसाची शेती केली जाते. दरम्यान सध्या तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी पावसामुळे उसाच्या पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट येण्याची शक्यता आहे. उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव देखील अशा वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात होतो.

ऊस व्यतिरिक्त हळद पिकावर देखील या ढगाळ वातावरणाचा मोठा विपरीत परिणाम होणार असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत आहेत. या हवामानातील बदलामुळे हळदवर कंदकुज होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत आज आपण उसावरील खोडकिडीचा तसेच हळद वरील कंदकुजवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऊस पिकातील खोडकिडीवर खालील पद्धतीने नियंत्रण मिळवता येणार

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे, ढगाळ वातावरणामूळे, दाट धुक्यामुळे बागायती पिके धोक्यात आली आहेत. ऊस पिकावर देखील या वातावरणाचा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. उसावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये. मात्र कोणत्याही रासायनिक औषधाचे फवारणी करणे अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हळद पिकातील कंदकुज व्यवस्थापन खालील प्रमाणे करता येणार :-

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत.

मात्र कोणत्याही रासायनिक औषधाची फवारणी करणे अगोदर कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा कृषी सेवा केंद्र चालक किंवा कृषी विद्यापीठाच्या सल्याचे पालन करणे अति आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe