पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत 90% अनुदानावर सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रोसेस, वाचा

Ajay Patil
Published:
pm kusum solar yojana

Pm Kusum Solar Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिल जात आहे. खरं पाहता शेती ही पाण्याविना करता येणे अशक्य आहे. या आधुनिकीकरणाच्या युगात आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे शोध लागले आहेत.

आता जमिनीविना शेती करता येणे देखील शक्य बनले आहे. परंतु पाण्याविना शेती करणे हे वर्तमानातही अशक्य आणि भविष्यातही अशक्य आहे. म्हणजे पाणी हा शेतीचा एक अविभाज्य भाग आहे तसेच पिकांना पाणी देण्यासाठी वीज लागते यामुळे शेतीसाठी वीज देखील महत्वाची आहे. अशातच आता शेतकऱ्यांचे पारंपारिक विजेवरचे अवलंबित्व कमी व्हावं.

तसेच त्यांना खंडित वीजपुरवठाचा फटका बसू नये म्हणून शासनाने सौर पंप वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पीएम कुसुम सोलार योजना ही देखील अशीच एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले जातात जेणेकरून त्यांना दिवसादेखील सिंचन करता येऊ शकते.

यामुळे शेतकऱ्यांना वीज खंडित असली तरी देखील पिकाला पाणी देता येणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या योजनेच्या माध्यमातून तीन, पाच अन साडेसात एचपीचे सौर पंप दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 95 टक्के अनुदान देण्याचे प्रावधान आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90 टक्के अनुदान मिळतं आणि जर अर्जदार अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याला 95 टक्के अनुदान देण्याचे प्रावधान या योजनेत आहे. अर्थातच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला दहा टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे.

अनुदान किती मिळत बर?

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 3 एचपी सौर पंपासाठी एकूण किंमत 1,93,803 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या सौर पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा 19,380 रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे, तसेच एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 9,690 रुपये राहणार आहे.

5 एचपी सौर पंपसाठी एकूण किंमत 2,69,746 रुपये ठरवण्यात आली असून यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा 10% हिस्सा म्हणजे 26,975 रुपये राहणार आहे. तसेच एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -13,488 रुपये म्हणजे किमतीचा पाच टक्के हिस्सा राहणार आहे.

7.5 एचपी पंपसाठी एकूण किंमत 3,74,402 रुपये ठरवण्यात आली असून योजनेनुसार सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना दहा टक्के स्वहिस्सा आणि अनुसूचित जाती आणि जमाती लाभार्थ्यांना पाच टक्के स्वहिस्सा भरावा लागतो. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 37,440 रुपये एवढा राहणार असून एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -18,720 रुपये राहील.

कोणत्या शेतकऱ्याला किती एचपीचा सौर पंप मिळणार

योजनेत दिलेल्या निकषाप्रमाणे, अडीच एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 एचपी सौर पंप दिला जाणार आहे. तसेच अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 एचपी सौर पंप बसवण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तसेच 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5 एचपी पंप बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं.

योजनेच्या पात्रता नेमक्या कोणत्या

या योजनेअंतर्गत सौर पंपाचा लाभ घेण्यासाठी पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी पात्र राहतील. तसेच शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. याशिवाय अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. म्हणजेच आधीच सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र नेमके कोणती 

या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक असणार आहे. 

तसेच सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र देखील संबंधित अर्जदाराला सादर करावे लागणार आहेत.

याशिवाय अर्जदाराच आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक फोटो, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत.

या योजनेसाठी नोंदणी कशी करावी लागणार बरं?

या योजनेसाठी नोंदणी करणे हेतू https://www.mahaurja.com/meda/en या वेबसाईटवर आपणास भेट द्यावी लागेल.

सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी ‘महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी’ या ऑप्शनवर आपणास क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर एक सूचना आपल्या स्क्रीनवर दिसेल ती आपणास क्लोज करायची आहे.

यानंतर आपणास सिलेक्ट लैंग्वेज पर्यायाअंतर्गत मराठी भाषा सिलेक्ट करायची आहे.

यानंतर आपल्या पुढ्यात पीएम कुसुम योजनेचा लाभार्थी नोंदणी अर्ज ओपन होणार आहे.

या ठिकाणी तुम्ही सध्या डिझेल पंप वापरतात का? या प्रश्नाचे हो किंवा नाही असे उत्तर द्यायचं आहे.

हो असेल तर त्या ठिकाणी पंपा विषयक इतर बाबी प्रविष्ट करायच्या आहेत.

यानंतर अर्जदाराला आपली वैयक्तिक आणि आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. यात आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा जिल्हा, तालुका, गाव निवडाव लागणार आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे.

त्यानंतर जर अर्जदार व्यक्तीच्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध नसेल तर त्यांना तशा आशयाची त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळणार आहे. मात्र जर कोटा उपलब्ध असेल तर मग ऑनलाइन अर्जासाठी भरणा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. यानंतर पुढे पंपाचा तपशील आणि तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या तुमच्या प्रवर्गातील कोट्याचा तपशील दिलेला राहील. त्या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया यावर क्लिक करायचा आहे.

यानंतर तुमच्यापुढे एक ट्रांजेक्शन आयडी येईल त्या ठिकाणी आपणास नोंदणी फी 100 रुपये भरावी लागणार आहे. तत्पूर्वी आपणास त्या ठिकाणी विचारलेली नाव, पत्ता आणि फोन नंबर याची माहिती टाकून पेमेंट करायचे आहे.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी एक मेसेज ओपन होईल. यानंतर मग तुमच्या मोबाईलवर एक युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी संबंधित अर्जदार व्यक्तीची प्राथमिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यातील कोटा उपलब्ध झाल्यानंतर संबंधितांना एसएमएसच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. प्राथमिक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरणे, क्वोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्वीकारणं, कंपनी निवडणं आणि सौर पंप वाटप करणं ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध आहे

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाऊर्जाच्या अधिकृत साईटनुसार महाराष्ट्र राज्यातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात सौर पंपाचा कोटा उपलब्ध आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध नाही 

मात्र आपल्या अहमदनगर जिल्ह्यासहीतच औरंगाबाद, बुलढाणा, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, मुंबई, मुंबई उपनगर,नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर या जिल्ह्यात पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर पंपाचा कोटा उपलब्ध नाही. या योजनेबाबत अधिक माहिती हवी असेल तर आपण 020-3500 0450 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून योजनेबाबत अधिक माहिती तपशीलवार जाणून घेऊ शकता. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe