चर्चा तर होणारच ! मात्र 10 हजार खर्चून प्रयोगशील शेतकऱ्याने तयार केले कांदा लागवडीच यंत्र

Ajay Patil
Published:
Onion Cultivation

Onion Cultivation : शेतकरी बांधव अलीकडे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. असाच एक प्रयोग समोर आला आहे तो धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी बांधवाने चक्क कांदा लागवडीसाठी अद्भुत असं यंत्र तयार केल आहे.

विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश चौधरी या शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी उपयुक्त असं वाफा खाचे यंत्र बनवले आहे. यामुळे सध्या गणेश यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

खरं पाहता, महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. धुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात याची शेती होते आणि कुसुंबा व परिसर हा विशेषता कांद्याच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. यामुळे गणेश यांना कांदा लागवडीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची चांगलीच जाण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी कांदा वाफा खाचे यंत्र तयार केले आहे. कांदा लागवडीचे काम सोपे करण्यासाठी या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. या यंत्राच्या मदतीने कमी कालावधीत कांदा लागवड करता येणे शक्य होणार आहे. या यंत्राच्या मदतीने कांदा लागवड अतिशय अचूक तंत्रशुद्ध आणि एकसमान होण्यास मदत होणार आहे.

खरं पाहता कांदा रोप लावणी करताना वाफ्यात खाचे किंवा बीद पाडावी लागते. मजूर लोक खाचे पाडून मग कांद्याची लागवड करत असतात. मात्र या यंत्राच्या मदतीने खाचे पाडले जाणार आहेत. या यंत्राला असलेल्या रोलरमुळे जमिनीतील मोठे ढेकळे फुटून जातील आणि योग्य अंतरावर कांदे रोपे लावण्यासाठी खाचे तयार होतील.

म्हणजेच आता मजुरांना विळ्याने, खुरप्याने किंवा तत्सम अवजाराने खाचे पाडण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे निश्चितच एकसमान पद्धतीने कांदा लागवड करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे कांदा रोपांची संख्या वाढण्यास मदत होईल. साहजिकच या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे.

आता तुमच्या मनात या यंत्राच्या किमती बाबत प्रश्न पडला असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गणेश यांनी अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांच्या किमतीत या यंत्राला तयार करून दाखवला आहे. विशेष म्हणजे गणेश यांचा हा पहिला प्रयोग नसून याआधी देखील त्यांनी वेगवेगळ्या यंत्रांचे शोध लावले आहे. यामुळे पंचक्रोशीत त्यांची रँचो म्हणून ओळख आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe