EL Nino News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाने भारतीय मान्सून बाबत चिंता व्यक्त केली. अमेरिकन हवामान विभागाने एक अहवाल जारी केला या अहवालात भारतात यावर्षी एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेकडून यावर्षी दुसऱ्यांदा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच भारतात यावर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
यावर्षी मान्सून कमी राहील यामुळे पीक उत्पादनात घट होईल, दुष्काळासारखी परिस्थिती तयार होईल यामुळे शेतकऱ्यांच्या देखील चिंता वाढल्या आहेत. मात्र अमेरिकेने वर्तवलेला हा अंदाज घाईचा अंदाज असल्याच मत आता भारतीय तज्ञांकडून वर्तवलं जात आहे. तज्ञांच्या मते फेब्रुवारी-मार्च महिन्यातच यासंदर्भात भाकीत वर्तन म्हणजे जरा घाईच होणार आहे.
एवढेच नाही तर भारतीय तज्ञांनी या कालावधीत वर्तवलेल्या अंदाज हे सहसा चुकीचे ठरतात असं देखील सांगितलं आहे. यामुळे एलनिनो बाबतीत अंदाज बांधण्यासाठी भारतीय हवामान विभागाचा एप्रिल महिन्यातील अहवाल अति महत्त्वाचा राहणार असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हवामानावर एलनिनो आणि ला निना या दोन परिस्थितीचा प्रभाव राहतो. अशा परिस्थितीत या हवामान प्रणालीवर जगभरातील संशोधकांचे लक्ष असतं.
अशातच अमेरिकेने या परिस्थितीवर संशोधन केलं असून यावर्षी एलनिनोमुळे नैऋत्य मौसमी पावसावर परिणाम होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे भारतात नैऋत्य मोसमी पाऊस पडतो अशा परिस्थितीत यावर्षी भारतात यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज अमेरिकेने वर्तवला आहे. मात्र, या परिस्थितीचा अंदाज फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बांधला तर हा अंदाज कायमच चुकीचा ठरला आहे. याबाबतीत यापूर्वी देखील अनुभव आला आहे. यामुळे आत्तापासून या परिस्थितीचा अंदाज बांधणे घाईचे ठरणार आहे.
तसेच एलनिनोमुळे भारतात कमी पाऊस पडतोच असं नाही. अनेकदा सरासरी एवढा पाऊस एल निनोची परिस्थिती असताना देखील भारतात पडला आहे. यामुळे आत्तापासून या परिस्थितीचा धसका घेण्याच काही कारण नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केल आहे. याबाबतीत ज्येष्ठ हवामान तज्ञ रंजन केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे, नैऋत्य मौसमी पावसावर एल निनो आणि ला निना विपरीत परिणाम करतात असा सिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मात्र परिस्थिती या उलट आहे.
त्यांच्या मते जर एल निनो परिस्थिती एकूण दहा वेळा तयार झाली असेल तर त्यापैकी पाच वेळा या विपरीत परिस्थितीतही समाधानकारक पाऊस पडला आहे. यामुळे या परिस्थितीचा अधिक धसका घेण्याचे कारण नाही. शिवाय, फेब्रुवारी मार्च महिन्यात याबाबतीत वर्तवलेले अंदाज नेहमीच चुकीचे ठरले आहेत. संशोधनाअंती ही बाब उघड देखील झाली आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभाग एप्रिल महिन्यात मान्सून बाबत जो अंदाज वर्तवते त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिल महिन्यात मान्सून बाबत आपला पहिला अहवाल सादर करत असते.
त्यामुळे आता एप्रिल महिन्यात हवामान विभागाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिलं जातं किंवा काय अहवाल सादर केला जातो याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. एकंदरीत एल निनो बाबतीच आत्ताच निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार आहे असे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ केळकर यांनी व्यक्त केले आहे. यामुळे, अमेरिकेच्या हवामान विभागाने जाहीर केलेल्या अहवालावर आतापासूनच बोंबाबोंब करून, धसका घेऊन संभ्रम अवस्था तयार करण्याचं काही कारण नसल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे.