करवंदाच्या शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! एकरी मिळतय 2 ते अडीच लाखांचे उत्पादन, वाचा ही यशोगाथा

Ajay Patil
Published:
Farmer Success Story

Farmer Success Story : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे. असाच एक नवीन प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने राबवला आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंदाच्या शेतीचा प्रयोग केला आहे.

प्रामुख्याने रानात आढळणारे हे फळपीक चक्क व्यापारी तत्त्वावर उत्पादित करून या प्रयोगशील शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. वसमत तालुक्याच्या मौजे खंदारबन येथील गंगाधर साधू या शेतकऱ्याने ही किमया साधली आहे.

गंगाधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मनरेगाचा फळपीक लागवड योजनेचा लाभ घेत करवंदाची आपल्या पाच ते सहा एकर जमिनीवर लागवड केली. आता त्यांना यातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकरी पाच ते सहा टन उत्पादन त्यांना मिळत असून यातून त्यांना दोन ते तीन लाखांची कमाई होत आहे.

हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….

साधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, करवंद पिकासाठी खूपच कमी पाणी लागते. शिवाय या पिकावर अधिक रोगराई आढळत नाही म्हणून औषधाचा खर्च कमी राहतो. उत्पादन देखील चांगले मिळते शिवाय बाजारात याला चांगला दर आहे.

विशेष बाब म्हणजे एकदा लागवड केली की तीन वर्षानंतर उत्पादन सुरू होते आणि जवळपास 30 वर्षे यापासून उत्पादन मिळत राहते. यामुळे त्यांनी करवंद शेती करण्याचा निर्णय घेतला असून या करवंदाच्या पिकात सीताफळ हे आंतरपीक म्हणून लावले आहे.

साधू यांनी करवंद लागवड केल्यानंतर सोयाबीन, गहू या नगदी पिकांची देखील यामध्ये आंतरपीक म्हणून लागवड केली होती. यातूनही त्यांना चांगली कमाई झाली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी करवंदाची रोपे देखील तयार करण्यास सुरुवात केली असून 20 ते 25 रुपये प्रतियोग याप्रमाणे ते करवंद रोपांची विक्री करत आहेत.

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ स्टॉकने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दिला सहापट परतावा, पहा कोणता आहे तो स्टॉक

त्यांनी पाण्याची शाश्वत उपलब्धता व्हावी म्हणून शेतात विहीर आणि शेततळे बनवून घेतले आहे. याकामी शासकीय योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला आहे. एकंदरीत हिंगोलीसारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात या शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.

या प्रयोगामुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात या प्रयोगशील शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई केली असल्याने हा प्रयोग इतरही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. एकंदरीत जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेती हा फायदेशीर व्यवसाय ठरणार असल्याचे या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हे पण वाचा :- यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe