महत्वाची बातमी : जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात विविध बाबींना सवलती

अहमदनगर, दि.०४ – लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली या ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दिनांक 04 मे ते दि. 17 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील कन्टेन्टमेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाने नमूद केलेल्या विविध उपक्रमांना हे आदेश लागू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विविध बाबींना सुट दिलेली असली तरी लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास  भारतीय दंड  संहिता, 1860  (45) चे  कलम  188  नुसार कारवाई केली जाईल, अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध राहतील. असे स्पषट करण्यात आले आहे.

या आदेशानुसार खालील बाबींना मनाई राहील – सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्र येण्‍यास मनाई राहील.  वैदयकिय सेवा, एअर अम्‍बुलन्‍स व सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील.

सुरक्षा अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिलेल्‍या रेल्‍वे वाहतुकी व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची रेल्‍वे प्रवासी वाहतुक बंद राहील.  केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिल्‍या व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची सार्वजनिक आंतरराज्‍य बस वाहतुक.  मेट्रो रेल सेवा.  वैद्यकिय कारण अथवा केंद्रीय गृह मंत्रालयाने अनुमती दिल्‍या व्‍यतिरिक्‍त आंतरराज्‍य वैयक्तिक प्रवास.

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक / प्रशिक्षण / कोचिंग क्‍लासेस इत्‍यादी. (तथापी ऑनलाईन / दुरस्‍थः शिकवणी यास परवानगी राहिल.)  गृहनिर्माण / आरोग्‍य / पोलीस / शासकीय आस्‍थापना / आरोग्‍य कर्मचारी, अडकलेले मजुर आणि विलगीकरण सुविधा संबंधी आदरातिथ्‍य वगळता सर्व प्रकाराच्‍या Hospitality सेवा.  सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाटयगृह, बार, प्रेक्षागृहे, प्रार्थना गृहे तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.

सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन,  शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इत्‍यादीसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्‍थळे / प्रार्थना स्‍थळे नागरिकांचे प्रवेशासाठी बंद राहतील.

अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध राहतील. पासष्ट वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे मुलांना अत्‍यावश्‍यक सेवा व वैद्यकिय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई राहील. कन्टेन्टमेंट झोन मध्‍ये ओपीडी व मेडिकल क्लिनीक चालविण्‍यास मनाई राहील. सर्व नागरिकांना अनावश्‍यकरित्‍या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्‍यास मनाई राहील.

जिल्‍हयातील कन्टेन्टमेंट झोन वगळता सदरचा आदेश खालील उपक्रमांचे (Activities) बाबतीत लागु होणार नाही.

) कृषी विषयक बाबी:-

 कृषी विषयक सर्व कामे,तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील.  ज्‍याठिकाणी फळे, भाज्‍या, धान्‍ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये केवळ घाऊक व्‍यापारी, अधिकृत/ नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्‍याची मुभा राहील.सदर लिलावांच्‍या ठिकाणी हात धुण्‍याची पुरेशी व्‍यवस्‍था, हॅण्‍ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्‍ध करुन देण्‍याची जबाबदारी सचिव, कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्‍या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व संबंधितांना मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील.  आयुक्‍त, अहमदनगर शहर महानगरपालिका व मुख्‍याधिकारी सर्व (नगरपालिका/ नगरपंचायत) यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत्‍यांना वेळोवेळी आवश्‍यक ते सहकार्य करावे.  कृषी यंत्राशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर्स (CHC) सुरु राहतील.  कृषी संबंधित उपकरणे / यंत्रे यांची निर्मिती, वितरण व त्‍यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्‍ती करणारी सर्व दुकाने, खते, किटकनाशके व बी-बियाणे यांची दुकाने सुरु राहतील.पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्‍सम यांना राज्‍यांतर्गत व आंतरराज्‍यीय वाहतूकीची परवानगी असेल. शेत माल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्‍पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री.

ख) आस्‍थापना:-    शासकीय कार्यालयामध्‍ये उपसचिव व त्‍यावरील दर्जाचे अधिकारी 100 टक्‍के पर्यंत उपस्थित राहु शकतील. तसेच शासकीय कार्यालयामध्‍ये उर्वरित अधिकारी/कर्मचारी यांची आवश्‍यकतेनुसार 33 टक्‍के पर्यंत उपस्थिती राहील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण, पोलीस, कारागृह, होमगार्डस्, अग्निशमन व आपत्‍कालीन सेवा, आपत्‍ती व्‍यवस्‍थान व संलग्‍न सेवा, एनआयसी, सिमाशुल्‍क, भारतीय अन्‍न महामंडळ, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका/नगरपालिका यांच्‍या सेवा कोणत्‍याही निर्बंधाशिवाय कार्यरत राहतील.

खाजगी कार्यालयमध्‍ये आवश्‍यकतेनुसार 33% पर्यंत कर्मचा-यांसह सेवा सुरु राहतील. इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमे (ब्रॉडकास्‍टींग, डीटीएच, केबल सेवा), माहिती तंत्रज्ञान व त्‍यावर आधारीत सेवा (50% कर्मचारीसहीत) ग्रामपंचायत स्‍तरावरील सीएसपी सेंटर्स सुरु राहतील.  मात्र त्‍यांनी सदर सेवा पुरवितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे करावे.  वर्तमानपत्रे व मासिक यांचे व्‍दारवितरण ग्राहकाच्‍या पूर्वसंमतीने अनुज्ञेय राहील.  तथापि, व्‍दारवितरण करणा-या व्‍यक्‍तीस सॅनिटायझार व मास्‍क वापरणे बंधनकारक राहील.  तसेच त्‍यांनी  सोशल डिस्टंसिंगचेचे पालन काटेकोरपणे करावे. कोल्‍ड स्‍टोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींचे देखभालीकरीता सहाय्यभुत ठरणा-या व्‍यवस्‍थापन सुविधा सुरु राहतील.  वीज निर्मिती, वितरण आणि पारेषण यांचेकरीता आवश्‍यक असणा-या इलेक्‍ट्रीक ट्रान्‍सफॉर्मर्सची दुरुस्‍ती करणारे दुकाने / वर्कशॉप सुरु राहतील.  महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील बाजारपेठ व बाजार संकूलात जीवनावश्‍यक वस्‍तू विक्रीची दुकाने सुरु राहतील.महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील एकल(stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकूलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि, अशा भागात एखाद्या गल्‍लीत/रस्‍त्‍या लगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्‍यास अशा दुकानांपैकी फक्‍त जीवनावश्‍यक वस्‍तूंची विक्री करणारीच दुकाने सुरु राहतील. ग्रामीण भागात मॉल्‍स वगळता, इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु राहतील.

 वरील सर्व दुकानांमध्‍ये सामाजिक अंतर (Social Distancing) च्‍या तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक राहील. कुठल्‍याही दुकानासमोर अनावश्‍यक गर्दी दिसल्‍यास ते दुकान सील करण्‍यात येईल. तसेच आस्‍थापना प्रमुखावर फौजदारी गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल.

 घ) सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम:-

 बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला/विधवा यांची निवारागृहे, निवासगृहे सुरु राहतील.अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहे सुरु राहतील.जेष्ठ नागरीक/विधवा/स्वातंत्र्य सैनिक/ संगायो /इंगायो यांच्या निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन व  भविष्‍य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु राहतील. सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला बालके, महिला, स्तनदा माता यांचा पोषण आहार घरपोच देतील. कोणत्‍याही लाभार्थ्‍याला अंगणवाडीत बोलावले जाणार नाही.

 च) मत्‍सोत्‍पादन व पशुसंवर्धन:

मत्स्यव्यवसाय व त्या संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग सुरु राहतील. मत्स्य बीज उत्पादन व खाद्य पुरवठाकरणारे उद्योग सुरु राहतील.दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री, प्रक्रीया, वितरण करणारे, वाहतूक वपुरवठा करणार्‍यायंत्रणा सुरु राहतील. पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्म व पशूखाद्याशी संबंधितअसलेले, कच्च्या  मालाचा पुरवठा करणारे उदा. मका व सोया सर्व घटक सुरु राहतील.

) वनोत्‍पादन संबंधित:-पेसा, बिगर पेसा व वनविभागाचे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये तेंदूची पाने गोळा करणे, वनोषधी गोळा करणे, प्रक्रिया करणे, वाहतूक व विक्री व तत्सम उद्योग सुरु राहतील.वनातील इमारती लाकूड गोळा करुन लाकूड डेपोमध्ये साठा/ वाहतूक/विक्री करता येईल. वनीकरण व रेशीम लागवडी संबंधित कृती.

ज) वित्‍तीय क्षेत्र:-

सेबीअंतर्गतचे बाजारसेवा,  आयआरडीए अंतर्गत असलेल्या विमा कंपन्या, कोऑपरेटीव क्रेडीट सोसायटी सुरु  राहतील.

) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे :-सोशलडिस्टंसिंगचे पालन करुन सुरु राहतील व योजनेत काम करणारे सर्व कर्मचारी /मजूर यांनी काम करतांना मास्‍कचा वापर करावा. मनरेगाची कामे हाती घेतांना जलसिंचन व जलसंधारण विभागातील कामांना प्राधान्‍य देण्‍यात यावे.

) सार्वजनिक सोयीसुविधा:-

पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे. उदा. रिफायनिंग, वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री सुरु राहील (डिझेल विक्री २४ तास व पेट्रोल, एलपीजी इंधन विक्रीची वेळ सकाळी ०५  ते सकाळी ०९ वाजेपर्यंतच राहील). विज निर्मिती, पारेषण व वितरण सुरु राहील. पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत), कुरिअर सेवा देणा-या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व इंटरनेट सेवा सुरु राहतील. महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्‍यवस्‍थापनाची

कामे सुरु राहतील.

दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील.उदा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे,वाहनाद्वारेपशुखाद्य पुरवठा करणे.

शासकिय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळाचे उपक्रम/ आस्‍थापना, बँक, ATM, विमा सेवा सुरु राहतील.

अंत्‍यविधीसाठी जास्‍तीत जास्‍त 10 व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. फळे व भाजीपाला, एलपीजी गॅस वितरण सेवा सुरु राहील.

औषधालय- औषधालयामधुन नियमित वेळेत औषधांची विक्री करण्‍यात यावी.

प्रसारमाध्‍यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक) नियतकालिके, टि.व्‍ही. न्‍युज चॅनेल इत्‍यादींचे कार्यालय, चिक्‍स, चिकण व अंडी दुकाने व वाहतुक सेवा, जनावरांचे खाद्य, खुराक, पेंड विक्री दुकाने व वाहतुक सेवा, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय दुकाने व वाहतुक सेवा

) वाहतूक क्षेत्र:

सर्व वस्‍तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्‍वेव्‍दारे वस्‍तू, माल, पार्सल, यांची ने-आण करता येईल.  सर्व प्रकारचे वस्‍तू व माल वाहतूक करणारे ट्रक व तत्‍सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्‍पर यांच्‍या सोबतच वाहतूक करतील.  तसेच माल, वस्‍तू पोहोच केल्‍यानंतर रिकाम्‍या झालेल्‍या वाहनांना देखील वाहतूकीसाठी परवानगी असेल, तथापि, वाहन चालवणा-याकडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील.ट्रक व तत्‍सम माल वाहतूक करणा-या वाहनांची दुरुस्‍ती करणारी दुकाने सुरु राहतील.तथापि, संबंधितांना केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सुचना, आदेश, निर्देशांचे गांर्भियाने पालन करावे लागेल व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागतील. रेल्‍वे वाहतकीच्‍या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी/ कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना संबंधित आस्‍थापना यांनी दिलेल्‍या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल. अत्‍यावश्‍यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्‍ये केवळ वाहनचालक व इतर दोन व्‍यक्‍ती यांना परवानगी राहिल व दुचाकी वाहनांकरीता केवळ वाहनचालक यांनाच परवानगी राहील. मात्र जीवनावश्‍यक वस्‍तूंचे खरेदीकरीता लोकांना जवळचे दुकानावर पायीच जाणे अभिप्रेत आहे. (टॅक्‍सी ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, खाजगी दुचाकी व खाजगी कार यांना कोणत्‍याही प्रकारे वाहतुकीची परवानगी असणार नाही.) केवळ अनुज्ञेय असलेल्‍या कामांसाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या मान्‍यतेनेच व्‍यक्ती आणि वाहनांच्‍या आंतरजिल्‍हा हालचालीस परवानगी राहील.

ड) बांधकाम क्षेत्र:-

रस्‍ते बांधणी, सिंचन प्रकल्‍प, सर्व प्रकारच्‍या औद्योगिक प्रकल्‍पांची बांधकामे (ग्रामीण भागातील सुक्ष्‍म,   लघू व मध्‍यम प्रकल्‍पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणा-या तारा ओढणे, ऑप्‍टीकल केबल / फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील.  तथापि, संबंधित कामांची पडताळणी त्‍या त्‍या विभागातील संबंधित अधिकारी यांनी करावी.  तसेच या प्रकारच्‍या कामावर असणा-या मजूरांची जेवणव राहण्‍याची सोय संबंधित ठेकेदार यांनीच करावी व सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाईल, याची दक्षता घ्‍यावी. कामाच्‍या ठिकाणी हात धुण्‍यासाठी पुरेशी सुविधा, मास्‍क, सॅनिटाईजर्स/साबण उपलब्‍ध करुन देण्‍याची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची राहील.अत्‍यावश्‍यक मान्‍सुन पूर्व कामे, इमारतीचे शटरिंग, वॉटरप्रुफींग, पुर संरक्षण, इमारतीची रचना व दुरुस्‍ती, असुरक्षित इमारती पाडणे, रिन्‍युएबल उर्जा प्रकल्‍पांची कामे सुरु राहतील. ज्‍याठिकाणी कामावर कामगार उपलब्‍ध आहेत व बाहेरील ठिकाणाहून कामगार आणण्‍याची परवानगी आवश्‍यकता नाही, अशा प्रगतीपथावर असणा-या बांधकाम प्रकल्‍पांची महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील कामे सुरु राहतील. ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्‍या बांधकाम प्रकल्‍पांना परवानगी राहील. बांधकामाचे ठिकाणी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे, हात धुण्‍यासाठी सॅनिटायझर्सचा /साबणचा वापर करणे आणि सर्वांनी मास्‍क वापरणे बंधनकारक राहील.

ढ)  उद्योग / औद्योगिक आस्‍थापना :-

(अ) नागरी भागातील उद्योग आणि औद्योगिक आस्‍थापनांना शिफ्ट मध्‍ये कामकाज चालविणे व योग्‍य ते सामाजिक अंतर (Social Distancing) चे काटेकोर पालन करुन खालील उद्योग सुरु ठेवता येतील. यामध्ये नागरी भागातील उत्पादन व इतर औद्योगिक आस्‍थापना ज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स (EoUs), औद्योगिक वसाहती आणि कन्टेन्टमेंट झोन नसलेल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती.  जीवनावश्‍यक वस्‍तुंचे उत्‍पादन करणारे उदयोग,औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, त्यांचे कच्चा माल आणि मध्यावस्‍था माल यासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिटस, आयटी हार्डवेअरचे उत्‍पादन उद्योग. पॅकेजिंग सामग्रीचे उत्पादन उदयोग. (ब) ग्रामीण भागातील सर्व उद्योग आणि औद्योगिक आस्‍थापनास शिफ्ट मध्‍ये कामकाज चालविणेस व योग्‍य ते सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करुन सुरु राहतील