Business Idea : हा धमाकेदार व्यवसाय सुरू करा! महिन्याला कमवा 50 हजार, वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea : व्यवसायांचे प्रकार पाहिले तर ते प्रामुख्याने दोन प्रकारचे दिसून येतात. यामध्ये एक हा हंगामी स्वरूपाचा व्यवसाय असतो. म्हणजेच एखाद्या कालावधीमध्ये किंवा ऋतूमध्ये असे व्यवसाय करणे फायद्याचे ठरते व दुसरा प्रकार म्हणजे बारमाही व्यवसाय जे कोणत्याही कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतात. यामधून तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे तुमच्या इच्छेवर सर्वस्वी अवलंबून आहे.

त्यामुळे जर आपण उन्हाळ्याचा विचार केला तर सगळीकडे अंगाची लाही लाही करणारा उकाडा जाणवत असतो व त्यामुळे या दिवसांमध्ये शीतपेय यांच्या व्यवसायाला खूप मोठी मागणी असते व त्यासोबतच शुद्ध आणि गारेगार पाणी मिळाले तर खूप महत्त्वाचे ठरते.

याच अनुषंगाने जर मिनरल वॉटर प्लांट व्यवसायाचा विचार केला तर हा खूप फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायाच्या माध्यमातून शुद्ध केलेले पाणी हे जार किंवा पाणी पाऊचच्या माध्यमातून पॅकिंग करून ते बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जाते. या व्यवसायाला आजकालच्या कालावधीमध्ये खूप मागणी असल्यामुळे हा एक फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो.

 आरओ वॉटर अर्थात मिनरल वाटर प्लांट व्यवसायातील संधी

सध्या हा व्यवसाय आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तारला असून तेवढ्या संधी देखील या व्यवसायात आहेत. आपल्याला माहित आहे की लग्नाचा कार्यक्रम असो किंवा कुठल्याही धार्मिक किंवा सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये तुम्हाला जार मधील पाणी बघायला मिळतेच.

तसेच तुम्ही जर या मिनरल वॉटरचे जार किंवा पाणी पाऊच घरोघरी किंवा दुकानांमध्ये जाऊन सप्लाय केला तरी देखील तुम्ही चांगला पैसा या माध्यमातून करू शकता. तसेच शहरी भागांमध्ये विविध ऑफिसेस तसेच हॉटेल्स या ठिकाणी देखील पाण्याचा जार सप्लाय करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता.

 व्यवसाय सुरू करण्याअगोदर मार्केट अभ्यासा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिनरल वॉटर प्लांट ज्या ठिकाणी टाकायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारपेठेमध्ये जाऊन त्या ठिकाणी या व्यवसायाचे ग्राहक कोणकोणते आहेत आणि किती प्रमाणात आहेत याचा रिसर्च करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच घरी तुम्ही किती जार करू शकतात किंवा किती दुकानात तुमच्याकडून जार विकत घेऊ शकतात यांची यादी बनवणे गरजेचे आहे.

तसेच यादी बनवल्यानंतर किती लिटर पाणी कोणता ग्राहक घेणार आहे याची देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच इतर जे प्लांट आहेत ते कोणत्या किमतीमध्ये त्यांचे पाणी विकत आहेत हे देखील तुम्ही अभ्यासणे गरजेचे आहे. या सगळ्या बाबीतून तुम्हाला तुमच्या व्यवसायाची व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल.

 जागेची निवड महत्त्वाची

मिनरल वॉटर प्लांट टाकण्यासाठी ज्या ठिकाणी पाणी पातळी जास्त आहे आणि वाहतुकीची साधने देखील मुबलक आहेत अशा जागेची निवड करणे गरजेचे आहे. सोबतच विजेची उपलब्धता आणि स्वच्छ वातावरण देखील तुम्हाला गरजेचे आहे. म्हणजेच एकंदरीत ज्या ठिकाणी मार्केट जवळ असेल किंवा तुमचा ग्राहक जवळ असेल अशा ठिकाणी तुम्ही हा प्लांट टाकण्याकरिता जागा निवडू शकता.

 लागणाऱ्या परवानग्या आणि रजिस्ट्रेशन

याकरिता तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे गरजेचे असून या नोंदणी मध्ये जीएसटी नोंदणी महत्त्वाचे आहे. तसेच तुम्हाला जर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर प्लांट उभारायचा असेल तर त्याकरता तुम्हाला बीआयएस प्रमाणपत्र आणि आयएसआय परवाना देखील लागतो.

 या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री

या व्यवसायाकरिता विजेची गरज लक्षात घेता तुम्हाला कमर्शियल विजेचे कनेक्शन घेणे गरजेचे आहे. तसेच हा व्यवसाय पाण्याची संबंधित असल्यामुळे तुम्हाला तुम्ही ज्या जागेवर प्लांट उभारत आहात त्या जागेच्या सभोवती किंवा जागेमध्ये बोअरिंग करणे खूप गरजेचे आहे. तसेच पाणी स्टोरेज करता यावे याकरिता तुम्हाला टाकी घेणे देखील गरजेच आहे. त्यासोबतच तुम्हाला पाणी फिल्टर करण्याकरिता आरो फिल्टर मशीन आणि फिल्टर केलेले पाणी थंड ठेवण्याकरिता तुम्हाला चीलिंग मशीन अर्थात शीतकरण यंत्र यांची आवश्यकता असते.

ही यंत्रसामुग्री तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान मिळेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पाणी ज्या ठिकाणी सप्लाय करायचा आहे ते पाणी पाठवण्याकरिता कंटेनर ची आवश्यकता असते. पाणी भरण्यासाठी तुम्ही पारदर्शक असे प्लास्टिकच्या बरण्या किंवा जार त्यासाठी वापरू शकता.

एक प्लास्टिकची बरणी ही 150 रुपयाला तुम्हाला मिळेल. यामध्ये साधारणपणे वीस लिटर पाणी मावते. तसेच तुम्ही ज्या जारमध्ये दुकानदारांना किंवा काही घरांमध्ये हे पाणी पोहोचवणार आहात त्या जारवर तुमच्या प्लांट चे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता असलेले स्टिकर्स लावणे गरजेचे असून या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात देखील होण्यास मदत होते.

तसेच तुम्हाला ऑर्डरच्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याकरिता छोटा टेम्पो किंवा रिक्षा घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारची वाहने तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकतात. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही हे शुद्ध केलेले पाणी जर पाऊचच्या माध्यमातून विकणार असाल तर तुम्हाला पाऊच पॅकिंग मशीनची आवश्यकता भासते.

 या व्यवसायाला साधारणपणे किती येतो खर्च?

तुम्ही यामध्ये किती मोठा प्लांट टाकणार आहात त्यावर तुमचा खर्च अवलंबून आहे. जर तुम्ही फक्त आरो वॉटर प्लांटचा व्यवसाय सुरू करत असाल तर त्याकरिता तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये लागतील. तसेच तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही याकरिता कर्ज देखील मिळवू शकतात. जर साधारणपणे आपण याकरिता लागणारा एकूण खर्च पकडला तर तो अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 व्यवसाय वृद्धीकरिता मार्केटिंग महत्त्वाची

तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करणे गरजेचे आहे. जाहिरातीसाठी तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावू शकतात किंवा जे ग्राहक तुमचे पाण्याचे जार घेतात त्यांच्याकडे तुमचे व्हिजिटिंग कार्ड दिले तरी चालते.

तसेच सोशल मीडियाचा आधार देखील तुम्ही घेऊ शकतात. जेणेकरून अशा जाहिरातीमधून तुमची विक्री वाढेल व तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता. एखाद्या कार्यक्रमांमध्ये जर तुम्हाला ऑर्डर असेल तर तुम्ही अशा ठिकाणी देखील तुमच्या व्यवसायाची जाहिरात लावू शकता.

 या व्यवसायात किती मिळू शकतो नफा?

दोन ते तीन लाखाच्या दरम्यान सुरू झालेला हा व्यवसाय सर्व खर्च वजा जाता दिवसाला तुम्हाला दोन ते तीन हजार रुपयांची कमाई आरामात देऊ शकतो. जसजसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसतसा तुमच्या आर्थिक उत्पन्न वाढीवर देखील सकारात्मक परिणाम दिसून येईल. कमीत कमी पकडले तरी तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये आरामात या व्यवसायाच्या माध्यमातून कमावू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe